Sunday , September 20 2026
Breaking News

बंगळुर बाहेर उभारणार दुसऱ्या क्रमांकाचे मोठे क्रिकेट स्टेडियम

Spread the love

 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

बंगळूर : देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आज मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. बंगळुरच्या बाहेरील भागातील आनेकल तालुक्यातील सूर्यनगर चौथ्या टप्प्यात हे भव्य स्टेडियम उभारले जाणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे मागील आयपीएल विजेतेपदाच्या जल्लोषावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील विद्यमान स्टेडियमवरील ताण कमी करण्यासह वर्षभर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी हे नवे स्टेडियम उभारले जात आहे.

गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम सध्या देशातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असून त्याची आसन क्षमता १.३२ लाख आहे. आनेकलजवळ उभारल्या जाणाऱ्या नव्या स्टेडियममध्ये तब्बल ८० हजार प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात क्रिकेट स्टेडियमसमोर राज्याची कला व सांस्कृतिक परंपरा दर्शविणारी रचना तसेच क्रिकेटच्या इतिहासाचे दर्शन घडविणारी वास्तुरचना उभारली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात इनडोअर स्टेडियम, जलतरण तलाव आणि भव्य अधिवेशन सभागृहाची निर्मिती केली जाणार आहे. या संपूर्ण क्रीडा संकुलाला “केएचबी सूर्य क्रीडा ग्राम” असे नाव देण्यात आले आहे.

या भव्य प्रकल्पासाठी सुमारे ९,४३.४६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *