Monday , September 21 2026
Breaking News

कपिलेश्वर मंदिर परिसरात आता “ड्रेस कोड”; धार्मिक पवित्रता आणि शिस्त राखण्यासाठी निर्णय

Spread the love

 

बेळगाव : कपिलेश्वर मंदिर परिसरातील धार्मिक पवित्रता, शिस्त आणि पारंपरिक वातावरण कायम राखण्यासाठी भाविकांसाठी आत्ता “ड्रेस कोड’ नियम लागू करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

मंदिर प्रशासनाने अयोग्य पोशाखात येणाऱ्या भाविकांवर निर्बंध घालण्यासाठी परिसरात सूचना फलक उभारले असून यासंदर्भात जनजागृती मोहीमही सुरू केली आहे. अलीकडे काही भाविक पाश्चिमात्य पोशाखात मंदिरात येत असल्याचे तसेच शिवलिंगाजवळ रील्स आणि व्हिडिओ चित्रिकरणाचे प्रकार वाढल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

मंदिराचे सचिव अभिजित चव्हाण यांनी सांगितले की, येत्या श्रावण महिन्यापासून या नियमांची अधिक कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मंदिराचे धार्मिक महत्त्व आणि पारंपरिक संस्कृती जपणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय मंदिराच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. मंगळवार ते रविवार मंदिर रात्री ९.३० वाजेपर्यंत खुले राहणार असून सोमवारी भाविकांसाठी मंदिर रात्री १०.३० वाजेपर्यंत खुले ठेवण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *