Monday , September 21 2026
Breaking News

इंधन दरवाढ कायम; बेळगावात पेट्रोल ११०.७४ तर डिझेल ९८.६९ रुपयांवर

Spread the love

 

बेळगाव : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. सलग काही दिवसांपासून इंधनाच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याने वाहनधारकांच्या खर्चात वाढ झाली असून, त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावरही होताना दिसत आहे. सध्याच्या दरानुसार बेळगावात पेट्रोलचा दर प्रतिलिटर ११०.७४ रुपये, तर डिझेलचा दर ९८.६९ रुपये इतका झाला आहे. नव्या दरवाढीत पेट्रोलमध्ये २.८४ रुपये आणि डिझेलमध्ये २.८१ रुपयांची वाढ झाली आहे.

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम बाजारातील विविध वस्तूंच्या किमतींवर होऊ शकतो. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरांमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, शासनाने इंधन दरांबाबत तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *