Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव महापालिकेला आज कन्नड संघटनांचा घेराव; बेळगावातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटक समर्थक ठराव मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी विविध कन्नड समर्थक संघटनांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवार दि. २६ रोजी बेळगाव महापालिका कार्यालयावर घेराव घालणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

कन्नड सेना–कर्नाटक, कित्तूर कर्नाटक सेना, गडीनाड कन्नडिगा सेना, कन्नड क्रिया समितीसह २० हून अधिक कन्नड समर्थक संघटना या आंदोलनात सहभागी होणार असून, हजारो कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कन्नड चळवळीतील अनेक प्रमुख नेते, संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.

कन्नड समर्थक संघटनांच्या मते, बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटक समर्थक ठराव मंजूर करण्याची मागणी अनेक दशकांपासून सातत्याने केली जात आहे. मात्र, प्रशासन आणि सरकारकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.

बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असून सीमावादासंदर्भातील महाजन आयोगाचा अहवाल अंतिम मानून त्यानुसार महापालिकेने ठराव मंजूर करावा, अशी ठाम भूमिका कन्नड संघटनांकडून केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *