Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी तालुक्यात ९८ टक्के पाठ्यपुस्तके दाखल

Spread the love

 

निपाणी तालुक्यातील ५२ हजार ७५७ विद्यार्थ्यांना लाभ; उन्हाळी सुट्टीतच वाटप सुरू

निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातील पाचवी ते दहावी वीच्याविद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा सुरू होण्यापूर्वी शासनातर्फे शिक्षण खात्याने मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळावा, यासाठी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने केलेल्या नियोजनानुसार पाठ्यपुस्तकांची पहिली गाडी शहरात दाखल झाली आहे. त्यानुसार, शाळाशाळांमध्ये या पुस्तकांचे सुयोग्य पद्धतीने वाटप करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने तयारी केली असून काही शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू झाले आहे. लवकरच दुसरी गाडीदेखील येणार असल्याने सर्वांना वेळेत सर्व पुस्तके मिळतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ आणि समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षांसाठी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निपाणी तालुक्यात पाचवी व सातवीच्या पाठ्यपुस्तकांचा पहिला साठा प्राप्त झाला आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्यात आले आहेत.
निपाणी गटशिक्षणाधिकारी कार्यालय कार्यक्षेत्रात एकूण ५२ हजार ७५७ विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मराठी माध्यमातील ३२ हजार ८२६, सेमी-इंग्रजी माध्यमातील १७ हजार १९८ तर उर्दू माध्यमातील २ हजार ७३३ विद्याथ्यर्थ्यांचा समावेश आहे.
——————————————————————-
‘सर्वसाधारणपणे शाळा ज्या दिवशी सुरु होतात, त्याच दिवशी पुस्तके मिळाली तर विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो. शिवाय शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागताला पुस्तके मिळण्याच्या अपेक्षेने पालक विद्याध्यर्थ्यांना शाळेत आवर्जुन पाठवतात. त्यामुळे शाळेत आल्यानंतर पुस्तके मिळाल्यानंतर त्याचा विद्यार्थ्यांना आनंद होऊन त्याची चांगला परिणाम त्यांच्या शाळेतील नियमित उपस्थितीवरही होताना दिसून येतो. हे लक्षात घेऊन शिक्षण विभागाने सर्वांना मोफत पाठ्यपुस्तकांचा शाळेच्या पहिल्याच दिवशी लाभ मिळेल, यादृष्टीने नियोजन केले आहे.’
-महादेवी नाईक, गटशिक्षणाधिकारी, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *