Wednesday , December 17 2025
Breaking News

LOCAL NEWS

बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वार्षिक सभेत माजी आमदारांचा निषेध

  २०२४-२०२९ सालाकरिता नव्या कार्यकारिणीची निवड बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. १ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडली. या सभेत पत्रकार संघास मिळालेला निधी अन्यत्र वळविल्याने माजी आमदार अनिल बेनके यांचा निषेध करण्यात आला. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक होते. प्रारंभी संघाचे …

Read More »

मराठा समाजातील युवकांनी उत्सवामध्ये गुंतू नये

  मराठा समाज सुधारणा मंडळाची सभा संपन्न बेळगाव : मराठा समाजातील युवकांनी सण, उत्सवामध्ये गुंतून न जाता शिक्षण, नोकरी व उद्योगधंद्याकडे लक्ष द्यावे असे मत मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अनेकांनी व्यक्त केले. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे होते. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष शिवराज पाटील, खजिनदार के. एल. मजूकर, …

Read More »

सिद्धरामय्या यांच्या पत्नी बीएम पार्वती यांचा १४ भूखंड परत करण्याचा निर्णय

  बेंगळुरू : कर्नाटकातील बहुचर्चित म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीमधील घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या वादात अडकले आहेत. आता सिद्धरामय्या यांच्या पत्नी बीएम पार्वती यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीला पत्र लिहिले असून त्यांना वाटप केलेले १४ भूखंड परत करणार असल्याचे सांगितले आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, माझ्याविरोधात सुरू असलेल्या द्वेषाच्या राजकारणाला …

Read More »

चलवेनहट्टी येथील ब्रम्हलिंग देवस्थानाचा अभिषेक

  बेळगाव : चलवेनहट्टी येथे ब्रम्हलिंग देवस्थानाच्या नुतन मुखवट्याचा अभिषेक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुर्वीचे मुखवटे जुने व अकाराने लहान आणि जीर्ण झाले असल्याने नविन मुखवट्याचा साज चढविण्याचा निर्णय कमिटीने घेतला. या नुतन मुखवटाच्या खरेदीसाठी भाविकांनी अर्थिक देगणी दिल्याने नुतन मुखवटाचा साज चढवला जाणार आहे. अभिषेक सोहळा घटस्थापना तसेच …

Read More »

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन

  बेळगाव : बेळगावचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक नेते कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना “महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार” कोल्हापूरचे माननीय खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. महात्मा गांधी विचार मंच गडहिंगलज जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी …

Read More »

संजीवीनी फौंडेशनच्या “उमंग २०२४”चे आज आयोजन

  युवा व्याख्याते युवराज पाटील यांचे व्याख्यान बेळगाव : येथील संजीवीनी फौंडेशनच्यावतीने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘उमंग २०२४’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यानिमित्त मंगळवारी (ता.१) सायंकाळी ४ वाजता लोकमान्य रंग मंदिरात येथे युवा व्याख्याते युवराज पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. संजीवीनी फौंडेशनने साठ वर्षांवरील नागरिकांसाठी गायन आणि नृत्य स्पर्धा आयोजित …

Read More »

एकाला भोसकल्याप्रकरणी बीएसएफ जवानाला अटक

बेळगाव : हॉटेलमध्ये बिल भरण्यावरून झालेल्या भांडणात एका तरुणाला बीएसएफ जवानाने भोसकल्याची घटना घडली असून आरोपीला पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. बेळगावातील सदाशिव नगर येथील आई हॉटेलमध्ये गँगवाडीतील तरुण जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यावर मालकाला पैसे देण्यावरून भांडण झाले. तिथे जेवत असलेला बीएसएफचा जवान परशराम रामगोंडनावर वाद मिटवण्यासाठी सरसावला पण …

Read More »

बैलहोंगल येथे क्षुल्लक कारणावरून एकाचा खून

    बैलहोंगल : तालुक्यातील अमतुर -बेविनकोप्प येथे रस्ता ओलांडल्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एकाचा भोसकून खून केल्याची घटना सोमवारी घडली. अमतुर गावातील केदारी यल्लाप्पा अंगडी (४२) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चाकूने वार केल्याने त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि उपचारासाठी सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचाराविना त्याचा मृत्यू …

Read More »

शिंदोळी येथील भारती पुजारी यांच्या कुटुंबीयांची मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली भेट

  बेळगाव : शिंदोळी येथील मंदिरात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांना पाहिल्यामुळे आपले पितळ उघडे पडू नये यासाठी चोरांनी येथील रहिवासी भारती पुजारी यांना विहिरीत ढकलून मारले. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली असून महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज मृत भारती पुजारी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी …

Read More »

बेळगाव ते बाची रस्त्याची तात्पुरती डागडुजी

  बेळगाव : पावसामुळे बिकट झालेल्या बेळगाव-बाची रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. गांधी चौक ते कुद्रेमानी या गावापर्यंतच्या रस्त्याची चाळण उडाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामकाजाला अखेर सुरुवात झाली आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी रस्त्याच्या संपूर्ण अवस्थेबाबत अहवाल देण्याच्या सूचना मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना …

Read More »