बेळगाव : चलवेनहट्टी येथे ब्रम्हलिंग देवस्थानाच्या नुतन मुखवट्याचा अभिषेक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुर्वीचे मुखवटे जुने व अकाराने लहान आणि जीर्ण झाले असल्याने नविन मुखवट्याचा साज चढविण्याचा निर्णय कमिटीने घेतला. या नुतन मुखवटाच्या खरेदीसाठी भाविकांनी अर्थिक देगणी दिल्याने नुतन मुखवटाचा साज चढवला जाणार आहे. अभिषेक सोहळा घटस्थापना तसेच नवरात्र उत्सवचे औचित्य साधून गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सकाळी पहाटे सहा वाजता केला जाईल त्यानंतर घटस्थापना होईल आणि मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुले केले जाणार आहे. नवरात्र उत्सव काळ असल्याने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे तसे नुतन मुखवट्याचा साज चढविलाने देवाचा सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. भाविकांनी अभिषेक तसेच घटस्थापना सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन ब्रम्हलिंग देवस्थान कमिटीने तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.