Tuesday , March 18 2025
Breaking News

थायलंडमध्ये शाळेच्या बसला आग; २५ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू

Spread the love

 

नवी दिल्ली : थायलंडमध्ये शाळेच्या बसला आग लागल्याची घटना घडली. या आगीत २५ विद्यार्थी आणि शिक्षकांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेने थायलंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अनेक कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये मंगळवारी शाळकरी विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक बसने सहलीला निघाले होते. याच बसला अचानक आग लागली. या बसला लागलेल्या आगीच्या धुरात अनेक जण अडकले. या बसच्या आगीत २५ विद्यार्थ्यांसहित शिक्षक होरपळले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. यानंतर काही विद्यार्थ्यांना रेस्क्यू करण्यात आले.

थायलंडचे परिवहन मंत्री सुरिया जुंगरुंगरुएंगकित यांनी घटनेची खात्री केली आहे. या बसमध्ये एकूण ४४ जण प्रवास करत होते. बसमधून १९ जणांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश आले तर बाकीचे लोक या बसमध्ये अडकले. त्यामुळे बसमधील उर्वरित लोकांचा होरपळून मृत्यू झाला, असे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत घटनास्थळावरून कमीत कमी १० मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. काही जणांच्या मृतदेहांचा कोळसा झाल्याची माहिती मिळत आहे.

About Belgaum Varta

Check Also

उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश

Spread the love    नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन होऊन 57 मजूर अडकले आहेत. त्यापैकी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *