Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : बेळगावचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक नेते कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना “महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार” कोल्हापूरचे माननीय खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. महात्मा गांधी विचार मंच गडहिंगलज जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10.00 ज्योती महाविद्यालय क्लब रोड, बेळगाव येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमात देण्यात येणार आहे.
खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या स्वागतासाठी सीमाभागातील मराठी भाषिकांनी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, माजी लोकप्रतिनिधींनी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार श्री. मनोहर किणेकर, चिटणीस एम. जी. पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *