बेंगळुरू : बेंगळुरू विधानसौधासमोर बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांच्या कारचा अपघात झाला असून ते किरकोळ जखमी झाले असल्याचे समजते. आमदार महंतेश कौजलागी यांच्या गाडीला आमदार घरातून येताना दुसऱ्या कारने धडक दिली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती कब्बनपार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Read More »LOCAL NEWS
तीन वर्षीय बालिकेची हत्या; आजी-आजोबांचा आरोप
बेळगाव : काही वर्षांपूर्वी आईचे निधन झाले. त्यानंतर सावत्र आई आणि वडिलांच्या सान्निध्यात वाढलेल्या मुलीचेही निधन झाले आहे. मात्र हा नैसर्गिक मृत्यू नसून खून असल्याचा आरोप मृत मुलीच्या आजी-आजोबांनी केला आहे. परकन्नट्टी येथील रायण्णा हंपण्णावर यांचा विवाह कडोली येथील भारती हंपण्णावर या तरुणीशी पाच वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना एक …
Read More »राज्यातील सिध्दरामय्या सरकारची वर्षपूर्ती वर्धापनदिनात आचारसंहितेचा अडथळा
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार अस्तित्वात येऊन आज (ता. २०) एक वर्ष पूर्ण होईल, परंतु नीती संहितेच्या पार्श्वभूमीवर पहिला वर्धापन दिन सोहळा स्थगित करण्यात आला आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाला. काँग्रेसचे १३५ आमदार निवडून आले. एक अपक्ष आमदाराने काँग्रेस पक्षाला …
Read More »अर्थ सहाय्याबद्दल समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार
बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सीमा प्रदेशातील 865 खेड्यातील नागरिकांना विविध रोगावर उपचार करून घेण्यासाठी मदत करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून श्री. सुनील लक्ष्मण कुरणकर आळवण गल्ली शहापूर बेळगाव यांना हृदय रोगावरील उपचारासाठी एक लाख रुपयांचे महाराष्ट्र शासनाच्यावतीने अर्थसहाय मंजूर करण्यात …
Read More »प्रज्वल दोषी आढळल्यास कारवाई करा
देवेगौडा यांनी दिली प्रथमच प्रतिक्रीया; कुटूंबाविरुध्द षड्यंत्र रचल्याचा आरोप बंगळूर : धजद खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांबाबत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी आज प्रथमच मौन सोडले. आपला नातू प्रज्वल जर दोषी आढळला तर त्यांच्यावर कारवाई करण्यास आपली कोणतीच हरकत नसल्याचे ते म्हणाले. मात्र आपले …
Read More »खासदार प्रज्वल रेवण्णा विरुद्ध विशेष न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी
बंगळूर : बलात्कार आणि लैंगिक छळाचा आरोप असलेले फरार धजद खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने शनिवारी अटक वॉरंट जारी केले. हसनमधील मालिका लैंगिक शोषण प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) दाखल केलेल्या अर्जानंतर हे वॉरंट जारी करण्यात आले होते, याची पुष्टी सुप्रसिद्ध सूत्रांनी …
Read More »जायंटस ग्रुप मेनच्या वतीने भग्न प्रतिमांचे संकलन
बेळगाव : हिंदू देवदेवतांच्या भग्न प्रतिमांचे अपमान टाळण्यासाठी सांबरा विमानतळ प्रवेशव्दार रस्त्यावर मधोमध असलेल्या वडाच्या झाडाखाली पाच पोती भग्न मूर्ती, फोटो, तुटक्या प्रतीमा जायंटस् संस्थेच्या वतीने जमा करण्यात आल्या. देशांतर्गत आणि विदेशांतील प्रवाशांच्या नजरेस येत होत्या. नागरिकानी भग्न प्रतिमांचा अपमान करू नये त्या विधीवत विसर्जित कराव्या आणि त्याचे पावित्र्य …
Read More »रेल्वे हल्ला प्रकरणातील संशयित आरोपीचे रेखाचित्र प्रसिद्ध
बेळगाव : टीसीसह अन्य चौघा जणांवर हल्ला करणाऱ्या माथेफिरूचा शोध घेण्यासाठी चार पथके नियुक्त करण्यात आली आहेत. रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी संशयिताचे रेखाचित्र प्रसिद्ध केले असून रेल्वे विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जखमींची भेट घेऊन माहिती घेतली आहे. गुरुवार दि. 16 मे रोजी सायंकाळी चालुक्य एक्स्प्रेसमधील एस-8 बोगीत लोंढाजवळ हा थरार …
Read More »कोप्पळजवळ भीषण अपघात : ४ जणांचा मृत्यू
गदग : हुलीगेम्मा देवीचे दर्शन घेऊन घरी परतताना कोप्पळ तालुक्यातील होसळीजवळ मागून येणाऱ्या खासगी बसने ट्रॅक्टरला धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना आज पहाटे घडली. या घटनेत 15 हून अधिक जण जखमी झाले असून जखमींना तातडीने कोप्पळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसवराज (22), करमुद्दी …
Read More »सुळगा येथे सिलेंडरच्या स्फोटात पती-पत्नी गंभीर जखमी
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील सुळगा येथे सिलेंडरचा स्फोट होऊन पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पहाटेच्या सुमारास घरातील सिलेंडरची गळती झाली. अचानक लाईट लावल्यामुळे स्फोट झाला. यावेळी घरात असलेले कल्लाप्पा पाटील (62) आणि सुमन पाटील (60) हे गंभीर जखमी झाले आहेत. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta