Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

पिण्याचे पाणी; चाऱ्याचा पुरेसा पुरवठा करा!

  त्रैमासिक केडीपी आढावा बैठकीत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे निर्देश बेळगाव : उन्हाळ्यात पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, विजेची कमतरता भासू नये यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्या. केडीपी २०२३-२४ ची तिसरी त्रैमासिक प्रगती आढावा बैठक शुक्रवारी (दि. …

Read More »

मंडोळी येथे हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : मंडोळी येथील श्री विठ्ठल रखुमाई, श्री कलमेश्वर आणि श्री मारुती मंदिर एकाच जागी संयुक्तिकरित्या होणार आहे. त्यानिमित्त मंडोळी येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य हळदीकुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल, माजी महापौर सरीता पाटील, डॉ. सोनाली सरनोबत, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, …

Read More »

मध्यवर्ती म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. बैठकीस सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष श्री. मनोहर किनेकर यांनी केले आहे.

Read More »

कन्नड पाट्यांसाठी महापालिका आयुक्त लोकेश यांची व्यापाऱ्यांना दमदाटी

  बेळगाव : बेळगावात दुकानांवर कन्नड पाट्या लावण्यासाठी महानगर पालिका आयुक्त पी. एन. लोकेश यांनी स्वतः बाजारपेठेत फिरून दमदाटी केली. सकाळीसकाळीच लोकेश यांच्या नेतृत्वाखालील टीमने नामफलकांवर कन्नड न वापरणाऱ्या दुकानांना टाळे ठोकले. बेळगाव शहरातील व्यावसायिक दुकाने आणि दुकानांच्या समोरच्या नामफलकांवर सरकारी नियमानुसार ६० टक्के कन्नड न वापरल्याबद्दल त्यांनी नोटीस बजावली. …

Read More »

श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूर येथे सचिव कै. के. बी. निलजकर यांची पुण्यतिथी साजरी

  येळ्ळूर : कै. के. बी. निलजकर हे संस्थेच्या जडणघडणाच्या काळात माझ्या पाठीशी सावलीप्रमाणे उभे होते. संस्थेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता के. बी. निलजकर हे जसे उत्तम प्रशासन होते तसेच ते नावाजलेले पैलवान व कृषी क्षेत्रातील जाणकार सुद्धा होते. त्यांच्या दिलेल्या मार्गदर्शनावरूनच आज संस्थेची घोडदौड चालू आहे संस्थेला आजही …

Read More »

जातनिहाय जनगणनेचा अहवाल राज्य सरकारला सादर

  मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेणार बंगळूर : बहुचर्चित जातनिहाय गणती (कर्नाटक सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण) अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. वीरशैव लिंगायत आणि वक्कलीग समुदायांच्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर स्थायी मागास आयोगाचे अध्यक्ष के. जयप्रकाश हेगडे यांनी गुरुवारी कांतराज समितीच्या डेटाच्या आधारे तयार केलेला अहवाल अधिकृतपणे मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या उत्तरादरम्यान विरोधकांचे धरणे, सभात्याग कागदपत्रे फाडून संताप व्यक्त

  बंगळूर : विधानसौधमध्ये पाकिस्तान समर्थक घोषणा देणाऱ्यांना हजर करावे, या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्य सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत काल विधानसभेत आंदोलन सुरू ठेवलेल्या भाजप आमदारांनी आजही धरणे आंदोलन पुढे चालूच ठेवले. सभागृदात कागदपत्रे फाडून सरकारविरोधात घोषणाबाजी केली व मुख्यमंत्र्यांच्या उत्तरादरम्यान सभात्याग केला. आज सकाळी सभागृहाचे कामकाज …

Read More »

बेळगाव शहराजवळ हत्तीचे दर्शन!

  बेळगाव : आज शुक्रवारी सकाळी बेळगाव शहर परिसराजवळील अलतगा, बसव कॉलनी, कंग्राळी (बीके) येथे हत्तीचे दर्शन झाले. हत्ती बसव कॉलनी परिसरात दिसल्याने नागरिकांनी हत्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती जंगलातून आलेला हत्ती आता महापालिका व्याप्तीपर्यंत पोहोचला आहे. बसव कॉलनी बॉक्साइट रोड परिसरात ज्यावेळी हत्ती दिसला त्यावेळी अनेकांना आनंद झाला तर …

Read More »

बेळगावकडे येणाऱ्या बसची एक्टिव्हाला धडक; मायलेकीचा मृत्यू

  होन्नावर : मंगळूरहून बेळगावकडे येणाऱ्या केएसआरटीसी बस आणि एक्टिव्हा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आई व मुलगी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी मानकी येथील गुळदकेरीजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. सविता राजू आचारी (वय 40) आणि मुलगी अंकिता (वय 17) राहणार नाडवरकेरी, मावळी मुरडेश्वर या मायलेकीचा अपघातात मृत्यू झाला आहे. मृत …

Read More »

कन्नडसक्ती विरोधात मराठी भाषिकांतून तीव्र संताप

  तातडीची बैठक घेण्याची समिती कार्यकर्त्यांची मागणी बेळगाव : राज्य सरकारने व्यावसायिक आस्थापने फलकांवर 60 टक्के कन्नड भाषेची सक्ती व उर्वरित 40 टक्क्यांमध्ये इतर भाषेत लिहिण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत विधानसभेत तसे विधेयक देखील मंजूर करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेचे अधिकारी काल दिवसभरात बेळगाव शहरातील इतर भाषेतील फलक हटविण्याची …

Read More »