बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (सीमाभाग) यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही सुंदर सार्वजनिक श्री गणेश मुर्ती स्पर्धा 2024 आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धा बेळगांव शहर मर्यादित उत्तर आणि दक्षिण विभागामध्ये होणार आहेत. श्री गणेश मुर्ती व मंडप परिसर स्वच्छता दोन्हींचे निरीक्षण होणार आहे. उत्तर विभागासाठी 5 …
Read More »LOCAL NEWS
जायंट्स मेनतर्फे शिक्षक दिनी 7 शिक्षकांचा सत्कार
बेळगाव : “आजचा विद्यार्थी हा तंत्रस्नेही असल्याने त्याला एका क्लिकवर जगातील कुठलेही ज्ञान मिळवता येते. त्यामुळे शिक्षक वर्गाने तंत्रस्नेही होणे ही काळाची गरज आहे” असे विचार निवृत्त शिक्षक श्री. बी. बी. शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले. येथील जायंट्स भवनात जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनच्या वतीने शिक्षक दिनी सात शिक्षकांचा …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती – शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका संज्योत बांदेकर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सर्व विद्यार्थ्यांना डॉ. राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक …
Read More »सरकारी आदर्श मराठी प्राथमिक शाळा सांबरा येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा
बेळगाव : सरकारी आदर्श मराठी प्राथमिक शाळा सांबरा येथे दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका ये पाटील यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. तसेच श्री. ए. बी. पागाद, व्ही. एस. कंग्राळकर, श्रीमती टी. वी. पाटील, श्रीमती आर. बी. लोहार, श्रीमती आर. बी. मगदूम, श्रीमती ए. …
Read More »चिंचोक्यांचा वापर करून साकारली माळी गल्ली मंडळाने श्रीमुर्ती
बेळगाव : एकीकडे प्रशासन प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीवर निर्बंध घालत असतानाच माळी गल्ली बेळगाव येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने चिंचेच्या बियांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवून समाजाला वेगळा असा संदेश दिला आहे. माळी गल्ली येथील गणेशोत्सव मंडळ हे दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यावर भर देत असते. मागील वर्षी देखील या मंडळाने …
Read More »स्वामी समर्थ आराधना केंद्रातर्फे अथर्व शिर्ष पठण स्पर्धा
बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त येथील स्वामी समर्थ आराधना केंद्र आणि श्री आधार मल्टीपर्पज सौहार्द सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली ते चौथी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अथर्व शिर्ष पठण स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. मंगळवार दि. 10 सप्टेंबर रोजी या स्पर्धा स्वामी समर्थ आराधना केंद्र, महाद्वार रोड बेळगाव …
Read More »गुरु विशिष्ट पुरस्काराने प्राचार्य डॉ. वेणुगोपाल जालीहाळ सन्मानित
बेळगाव : शिक्षक दिनाचे औचित्य साधून गोगटे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वेणुगोपाल जालीहाळ यांना कर्नाटकातील दयानंद सागर बिजनेस स्कूल या प्रतिष्ठित संस्थेने 2024 सालचा ‘गुरु विशिष्ट पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे. प्राचार्य डॉ. वेणूगोपाल जालीहाळ हे गत 22 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी शहरातील गोगटे वाणिज्य महाविद्यालयाच्या बीसीए …
Read More »श्री आधार मल्टी-पर्पज सौहार्द सह. संघाला 16.48 लाखाचा नफा
बेळगाव : श्री आधार मल्टी-पर्पज सौहार्द सहकारी संघ नियमित, महाद्वार रोड बेळगाव या संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात 16 लाख 48 हजाराचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती अध्यक्ष श्री. सुभाष देसाई यांनी दिली. संस्थेची चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.04/09/2024 रोजी श्री. सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात खेळीमेळीत पार पडली. …
Read More »कन्नड चित्रपटसृष्टीतील अत्याचाराच्या चौकशीसाठी समिती स्थापन करा
सुदीप, रम्यासह १५३ जणांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती बंगळूर : कन्नड चित्रपटसृष्टीत लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. अभिनेता सुदीप आणि रम्या यांच्यासह १५३ जणांनी स्वाक्षरी केलेल्या पत्राद्वारे यासंदर्भात समिती स्थापन करण्याची विनंती सरकारला केली आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील लैंगिक छळाबाबत न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालामुळे केरळमध्ये खळबळ उडाली आहे. यानंतर लगेचच मोहनलाल यांनी …
Read More »रेणुकास्वामी हत्या प्रकरण : अभिनेता दर्शन आणि इतराविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर
बी. दयानंद; ३,९९१ पानांचे आरोपपत्र बंगळूर : बंगळुर पोलिसांनी बुधवारी रेणुकास्वामी हत्याकांडातील चालेंजिंग स्टार दर्शनसह १७ आरोपींविरुद्ध एका सुरक्षित बॉक्समध्ये आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास केल्यानंतर एक मजबूत आरोपपत्र तयार करण्यात आले असल्याचे बंगळुरचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी आज पत्रकारांना सांगितले. आरोपपत्रात २३१ साक्षीदारांचे …
Read More »