Tuesday , April 7 2026
Breaking News

LOCAL NEWS

पोक्सो प्रकरण: येडियुरप्पा झाले सीआयडीसमोर सुनावणीला हजर

  बंगळूर : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा पोक्सो प्रकरणी चौकशीसाठी आज सीआयडी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. या प्रकरणी येडियुरप्पा यांना अटक न करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अटकेची भीती न बाळगता सीआयडी अधिकाऱ्यांसमोर हजर राहून या प्रकरणाबाबत आपले म्हणणे नोंदवले. बंगळुरमधील पॅलेस रोड येथील सीआयडी मुख्यालयात …

Read More »

भाजपकडे आंदोलन करण्याची नैतिकता नाही

  मुख्यमंत्र्यांचा भाजपवर घणाघात; मोदींच्या काळात इंधन दरात मोठी वाढ बंगळूर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन करण्याची भाजपकडे नैतिकता नसल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी केंद्रात पंतप्रधान झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाल्याचा पलटवार त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या गृह कार्यालय कृष्णा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पेट्रोल …

Read More »

भाजपच्यावतीने पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात निदर्शने

  बेळगाव : राज्य सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा निषेध करत बेळगावात भाजप कार्यकर्त्यांनी चक्क दुचाकीच्या दावणीला बैल बांधून निषेध नोंदविला. राणी कित्तूर चन्नम्मा येथे भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपचे आमदार अभय पाटील व माजी आमदार महादेवप्पा यादवाड, अनिल बेनके, महांतेश दोड्डगौडर, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी आदी नेत्यांनी दुचाकीला बैलाची जोड देत …

Read More »

गोवावेस येथील मनपाच्या महसूल विभागात चोरी

  बेळगाव : गोवावेस येथील मनपा इमारतीत असलेल्या महानगर निगम बेळगाव महसूल विभागामध्ये चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गोवावेस तेथील महानगरपालिकेच्या इमारतीत वार्ड क्र १ ते २६ दक्षिण विभागाचा कारभार चालतो. सकाळी १०-३० वाजता. ऑफिस कर्मचाऱ्यारी प्रवेश केल्यानंतर महत्वाची कागदपत्रे विस्कटल्याचे आढळून आले. तसेच एक लॅपटॉप देखील चोरीस गेल्याचे …

Read More »

बेळगावात बकरी ईद सण उत्साहात; ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा

  बेळगाव : बलिदानाचे प्रतीक असलेला मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-अधा किंवा बकरी ईद मोठ्या धार्मिकतेने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. बकरी ईदच्या निमित्ताने सामूहिक नमाज अदा ‘ईद-उल-अधा ‘ हा सण इस्लामिक कॅलेंडरच्या 12व्या महिन्यात म्हणजेच ए-जिल्हिज्जा महिन्यात साजरा केला जातो. मुस्लिम समाजातील लोकांसाठी हा सण खूप खास आहे. बलिदानाचे …

Read More »

मर्कंटाईल सोसायटीला जॉईंट रजिस्ट्रार यांची भेट

  बेळगाव : यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या दि. मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला बेळगावचे जॉईंट रजिस्ट्रार डॉ. सुरेशगौडा पाटील आणि त्यांचे सहकारी मुत्ताप्पा गौडप्पणावर यांनी सदिच्छा भेट देऊन सोसायटीच्या कार्याचे कौतुक केले. मर्कंटाइल सोसायटीचे चेअरमन श्री. संजय मोरे यांनी त्यांचे स्वागत केले आणि सोसायटी बद्दलची माहिती दिली. शाखा व्यवस्थापक …

Read More »

अवैध गोवंश तस्करी प्रकरणी बेळगावातील चाैघे ताब्यात, ९ जनावरांची सुटका; २९ लाखांचा मुद्देमाल जप्त

  बेळगाव : बेकायदेशिररित्या गुरांची वाहतूक करणाऱ्या कर्नाटक येथील चाैघांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मालवाहू ट्रक, एक कार आंबोली पोलीसांनी जप्त केली आहे. या धडक कारवाईत पाेलिसांनी एकूण २९ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानंतर जखमी बैलासह उर्वरीत बैल गोवा राज्यातील करासवाड- शिकेरी येथील गो शाळेत सुखरूप …

Read More »

जायंट्स ग्रुप मेनतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

  बेळगाव : जायंट्स या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय नाना चुडासमा यांचा १७ जून हा जन्मदिन दरवर्षी जायंट्स चळवळीमध्ये विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. यंदा जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने महावीर ब्लड बँक येथे आज रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरास १५ हुन अधिक सदस्य उपस्थित होते. या प्रसंगाचे औचित्य …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला इंधन दरवाढीचा बचाव

  विकास कामासाठी वापराची ग्वाही बंगळूर : लोकसभा निवडणुकीत हमी योजनांचा काँग्रेसला फारसा फायदा झाला नाही. दरम्यान, राज्यात विकासाची गती मंदावली असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, राज्य सरकारने काल इंधनाच्या दरात तीन रुपयांची वाढ जाहीर केली होती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या निर्णयाचा बचाव केला. दरवाढ होऊनही राज्यातील इंधनाचे दर देशातील …

Read More »

बेळगावात मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ३० हून अधिक ऑटो जप्त

  बेळगाव : बेळगाव शहरात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून विहित मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करून नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ३० हून अधिक ऑटो जप्त केले आहेत. नुकत्याच शाळा सुरू झाल्या असून शाळेतील मुलांना शाळेत सोडणे हे पालकांसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेत सोडण्यासाठी ऑटो रिक्षा आणि विविध …

Read More »