बेळगाव : म्हैसूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय दसरा कुस्ती स्पर्धा आणि सीएम चषक कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवून परतलेल्या डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल बेळगावच्या मुलींच्या संघाचे कडोली ग्रामस्थ आणि बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे आज सकाळी बेळगाव रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत करण्यात आले. म्हैसूर येथील देवराज कुस्ती आखाडा येथे गेल्या …
Read More »LOCAL NEWS
दसरा उत्सवासाठी पोलीस आयुक्तांना आमंत्रण!
बेळगाव : 2 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या ऐतिहासिक बेळगावचा दसरा उत्सवा निमित्त बेळगावचे शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांना आमंत्रण देण्यात आले. शेकडो वर्षाची परंपरा लाभलेला बेळगावचा दसरा उत्सव यंदाच्या वर्षी सुद्धा नियोजनबद्ध व शिस्तबद्धसाठी पार पडावा यासाठी मध्यवर्ती नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या माध्यमातून व शासनाच्या सहकार्याने प्रयत्न …
Read More »सरकारी नोकरीसाठी वयात ३ वर्षांची सूट
बंगळुर : राज्य सरकारने नोकरी शोधणाऱ्यांना दसऱ्याची बंपर भेट दिली आहे. सोमवारी नागरी सेवा पदांवर थेट भरतीसाठी वयोमर्यादा तीन वर्षांनी शिथिल करणारा एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. राज्य सरकारने आज एक अधिकृत आदेश जारी केला आहे ज्यामध्ये राज्य सरकारच्या विविध विभागांद्वारे घेण्यात येणाऱ्या थेट भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व …
Read More »बंगळूरात १० कोटींचे ड्रग्ज जप्त
अभियंता, विदेशी, विद्यार्थ्यांसह ७ जणांना अटक बंगळूर : सीसीबी पोलिसांनी सात ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे, ज्यात दोन विदेशी, एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि एक डेंटल विद्यार्थी यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ९.९३ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात यश आले आहे. अटक केलेल्यांकडून ३ किलो ८५८ ग्रॅम एमडीएमए क्रिस्टल, ४१ ग्रॅम …
Read More »तानाजी गल्ली रेल्वेगेट बंद केल्याने नागरिकांचा संताप : आंदोलनानंतर अखेर गेट सुरु
बेळगाव : तानाजी गल्ली बेळगाव येथील रेल्वे गेट तत्काळ खुला करण्यात यावा या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी सोमवारी दुपारी निदर्शने करत रेल रोको आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला. स्थानिक नागरिकांची तक्रार ऐकून रेल्वे प्रशासनाला बंद केलेला मार्ग पुन्हा खुला करावा लागला. तानाजी गल्ली रेल्वे गेट परिसरात यापूर्वीच वाहनांना बंदी …
Read More »जातीय जनगणना सर्वेक्षणात कन्नड, इंग्रजी अर्जामुळे मराठी भाषिकांची गोची!
बेळगाव : जिल्ह्यात जातीय जनगणना सर्वेक्षण सुरू आहे. तांत्रिक अडचणीमुळे सर्वेक्षण संथगतीने चालू आहे. सरकारकडून निर्धारित वेळेत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील उपनगरांमध्ये बऱ्याच ठिकाणी विहित अर्ज देण्यात आले असून तुमच्या कुटुंबाची माहिती तुम्हीच भरून द्या अशी सूचना अर्ज देणाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी …
Read More »कंग्राळी के.एच. ग्रामपंचायत कार्यालयासह नवीन ग्रंथालय इमारतीचे लोकार्पण
बेळगाव : बेळगाव तालुक्यात येणाऱ्या कंग्राळी के.एच. ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालय आणि ग्रंथालयाच्या इमारतींचे लोकार्पण अतिशय उत्साहात पार पडले. या इमारतींच्या उद्घाटनामुळे ग्रामस्थांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या असून, प्रशासकीय कामांना गती मिळणार आहे. बेळगाव जिल्ह्याचे प्रशासन, जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी रूर्बन योजनेअंतर्गत कंग्राळी …
Read More »लोकसभा आचारसंहिता भंग प्रकरणी जामीन मंजूर
बेळगाव : लोकसभा निवडणुक 2024 मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकसभा उमेदवार महादेव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना धर्मवीर संभाजी महाराज चौकातून मिरवणुकीचे आयोजन केले होते, या मिरवणुकी दरम्यान विना परवानगी जास्त लोक जमविण्यात आले व बैलगाडीतून विनापरवाना फेरी काढण्यात आली, याचा ठपका ठेवत लोकप्रतिनिधी कायदा कलम 125, कलम …
Read More »सीमोल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉम विभागाला मध्यवर्ती नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या वतीने निवेदन
बेळगाव : गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी विजयादशमी “सीमोल्लंघन” कार्यक्रमासाठी मध्यवर्ती नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हेस्कॉमचे बेळगाव शहर कार्यकारी अभियंता श्री. मनोहर सुतार यांची नेहरूनगर कार्यालयात भेट घेतली व येणाऱ्या दसरा उत्सवासंदर्भात चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम नुकताच पार पडलेल्या गणेशोत्सवादरम्यान हेस्कॉम अधिकारी व कर्मचारी यांनी चांगल्या पध्दतीने …
Read More »विजयोत्सवादरम्यान कत्ती समर्थकांकडून मंत्री सतीश जारकीहोळींच्या सहकाऱ्यांवर दगडफेक!
बेळगाव : हुक्केरी विद्युत सहकारी संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि माजी खासदार रमेश कत्ती यांच्या समर्थक उमेदवारांनी मोठा विजय मिळवला आहे. दरम्यान, विजयोत्सव साजरा करताना रमेश कत्ती समर्थकांनी अपमानास्पद वर्तन केले आणि मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या गाडीवर हाताने मारबडव केली आणि दगडफेकही केली. विजयोत्सवादरम्यान केलेल्या या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta