Monday , April 20 2026
Breaking News

दसरा उत्सवासाठी पोलीस आयुक्तांना आमंत्रण!

Spread the love

 

बेळगाव : 2 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या ऐतिहासिक बेळगावचा दसरा उत्सवा निमित्त बेळगावचे शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांना आमंत्रण देण्यात आले. शेकडो वर्षाची परंपरा लाभलेला बेळगावचा दसरा उत्सव यंदाच्या वर्षी सुद्धा नियोजनबद्ध व शिस्तबद्धसाठी पार पडावा यासाठी मध्यवर्ती नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या माध्यमातून व शासनाच्या सहकार्याने प्रयत्न करत आहेत. यावर्षीच्या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त यांना आमंत्रण देण्यात आले. याप्रसंगी दसरा महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, जनसंपर्क विकास कलघटगी, अंकुश केसरकर, लक्ष्मण किल्लेकर, बाळू जोशी, अनंत पाटील श्रीकांत कदम, सुरज कडूचकर, किरण हुद्दार, सचिन केळवेकर, शेखर तळवार आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *