Friday , November 6 2026
Breaking News

लोकसभा आचारसंहिता भंग प्रकरणी जामीन मंजूर

Spread the love

 

बेळगाव : लोकसभा निवडणुक 2024 मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकसभा उमेदवार महादेव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना धर्मवीर संभाजी महाराज चौकातून मिरवणुकीचे आयोजन केले होते, या मिरवणुकी दरम्यान विना परवानगी जास्त लोक जमविण्यात आले व बैलगाडीतून विनापरवाना फेरी काढण्यात आली, याचा ठपका ठेवत लोकप्रतिनिधी कायदा कलम 125, कलम 127 भारतीय दंड संहिता कलम 505 अधिक दोन असा गुन्हा उमेदवार महादेव पाटील, शुभम शेळके, मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, रेणू किल्लेकर, सरिता पाटील या समिती नेत्यावर कॅम्प पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला होता,

आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी वरील खटल्याची सुनावणी पाचव्या अतिरिक्त दिवाणी न्यायालयात होऊन वरील समिती नेत्यांना वीस हजाराच्या जातमुचलक्यावर, तितक्याच रकमेचा जामीन व पुन्हा असा गुन्हा घडणार नाही, या अटीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला.

या खटल्यात समिती नेत्यांच्या वतीने वकील महेश बिर्जे, वकील बाळासाहेब कागणकर, वकील रिचमन रिकी, वकील वैभव कुट्रे हे काम पहात आहेत, यावेळी मालोजी अष्टेकर, धनंजय पाटील, मनोहर हुंदरे, प्रकाश गडकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *