Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

डीके शिवकुमार संतापले, थेट मानहानीचा दावा ठोकण्याची केली तयारी

  बेंगळुरू : कर्नाटकमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणूकीत १३५ जागांवर विजय मिळवत काँग्रेस सरकारने घवघवीत यश मिळवले आहे. मात्र या विजयानंतर सध्याचा सर्वात मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे तो म्हणजे कर्नाटक मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण? डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे दोन काँग्रेसचे दिग्गज नेते या पदासाठी रिंगणात …

Read More »

सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब? कर्नाटक मुख्यमंत्रीपदाची उद्या घोषणा

नवी दिल्ली : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. बुधवारी (दि. 17) बंगळूरमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून त्यातच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे विधिमंडळ पक्षनेतेपदाची घोषणा करतील. मंगळवारी संध्याकाळी सीएम पदाचे दोन्ही दावेदार डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी खर्गे यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. …

Read More »

महिला विद्यालयाचा शतक महोत्सव कार्यक्रम मे महिन्याच्या अखेरीस

  बेळगाव : “बेळगाव शहरातील मराठी माध्यमातील मुलींची अग्रेसर शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या महिला विद्यालय या संस्थेला येत्या 27 मे रोजी शंभर वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त शतक महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय संस्थेच्या वतीने घेण्यात आला आहे”अशी माहिती संस्थेचे चिटणीस ऍड. श्री. विवेक कुलकर्णी यांनी बोलताना दिली. …

Read More »

बारावी पुरवणी परीक्षा 23 पासून

  बेळगाव : व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी महत्त्वाची असणारी सीईटी २० ते २२ मेपर्यंत होणार आहे. त्यामुळे बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यानुसार २३ मेपासून पुरवणी परीक्षेला विविध केंद्रांवर सुरुवात होणार आहे. ९ ते २९ मार्चपर्यंत बारावीची परीक्षा झाली होती. काही दिवसांतच पेपर तपासणीचे काम करून १५ दिवसांत बारावीचा निकाल …

Read More »

कर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम, सिद्धरामय्यांचे पारडे जड?, डी. के. शिवकुमार आज दिल्लीला जाणार

  बेंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट जनादेश मिळाल्यानंतर कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण? यावरुन अजूनही सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आज दिल्लीला जाणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या कालच दिल्लीत दाखल होऊन तेथे तळ ठोकून आहेत. तर शिवकुमार पोटदुखीने त्रस्त असल्याने बंगळूरमध्ये राहिले. शिवकुमार काल …

Read More »

टिळकवाडीत बर्निंग कारचा थरार

बेळगाव (प्रतिनिधी) : टिळकवाडीतील खानापूर रोडवर भर रस्त्यात डस्टर कारने अचानक पेट घेतल्याने चांगलीच तारांबळ उडाली. रात्री नऊच्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. खानापूर रोडवरील कॉसमॉस बँकेसमोर घडलेल्या या प्रकाराने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे अन्य मार्गांवर रहदारीचा ताण वाढला होता. रहदारीच्या मार्गावरील …

Read More »

शिवजयंती चित्ररथ मिरवणूकीची जय्यत तयारी

  बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शनिवार दि. २७ मे रोजी काढली जाणार आहे. जिवंत देखावे, लाठी मेळा, ढोल-ताशा, ध्वजपथक, लेझीम मेळा, हत्ती-घोडे अशा शिवमय वातावरणात चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. यासाठी शिवभक्तांकडून तसेच युवक मंडळांकडून जय्यत तयारी केली जात आहे. अवघे बारा दिवस शिल्लक राहिल्याने साहित्याची जमवाजमव, शिवचरित्रावरील प्रसंग …

Read More »

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्लीला रवाना

  बेंगळुरू : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाच्या निवडीवरून गोंधळ उडाला आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्लीला रवाना झाले असून आमदार जमीर अहमद यांनीही सिद्धरामय्या यांच्यासोबत दिल्लीचा प्रवास केला आहे. एकीकडे केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार मुख्यमंत्रीपदासाठी जोर लावत आहेत, …

Read More »

रेल्वेच्या धडकेत 15 हून अधिक म्हशींचा मृत्यू

  मंगळुरू : रेल्वेच्या धडकेने 15 हून अधिक म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना मंगळुरूजवळील जोकट्टे येथील अंगरगुंडी येथे घडली. वृत्त कळताच कद्री अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून रुळावरील गुरांचे मृतदेह बाहेर काढले. एक मालगाडी कंकनाडीहून एमसीएफच्या दिशेने येत होती. रेल्वेच्या आवाजाने घाबरलेल्या म्हशी रेल्वे पुलावर धावू लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती …

Read More »

रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज; मराठी भाषिकांचा निर्धार!

  बेळगाव : गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्र एकीकरण समितीने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. विधानसभा निवडणुकीत समितीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले असले, तरी याचा कोणताही परिणाम सीमालढ्यावर होणार नाही. आगामी काळात सीमाप्रश्नाची सोडवणूक करून घेण्यासाठी अधिक ताकदीने लढण्याचा निर्धार मराठी भाषिकांतून केला जात आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यापासून सीमाप्रश्नाची सोडवणूक करुन …

Read More »