Sunday , July 26 2026
Breaking News

बारावी पुरवणी परीक्षा 23 पासून

Spread the love

 

बेळगाव : व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी महत्त्वाची असणारी सीईटी २० ते २२ मेपर्यंत होणार आहे. त्यामुळे बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यानुसार २३ मेपासून पुरवणी परीक्षेला विविध केंद्रांवर सुरुवात होणार आहे.

९ ते २९ मार्चपर्यंत बारावीची परीक्षा झाली होती. काही दिवसांतच पेपर तपासणीचे काम करून १५ दिवसांत बारावीचा निकाल जाहीर केला होता. निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी २२ मेपासून पुरवणी परीक्षा घेण्यात येणार होती.

मात्र २०, २१ व २२ मे रोजी सीईटी होणार आहे. त्यामुळे परीक्षा वेळापत्रक बदल केला असून, जे विद्यार्थी सीईटी देणार आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेचा निकाल ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले होते. त्याला प्रतिसाद देत झाले आहेत.

बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक असे

* २३ मे – कन्नड, अरेबिक

* २४ मे – रसायन शास्त्र, बेसिक गणित

* २५ मे – इंग्रजी, माहिती तंत्रज्ञान रिटेल

* २६ मे – समाज शास्त्र

* २७ मे – इतिहास, संख्या शास्त्र

* २९ मे – हिंदी, मराठी, तमिळ, तेलगू, मल्याळम, उर्दू, संस्कृत, फ्रेंच

* ३० मे – भूगोल शास्त्र, मानसशास्त्र, भौतिकशास्त्र

* ३१ मे – अर्थशास्त्र, भूगर्भ शास्त्र, शिक्षण शास्त्र, गृह विज्ञान

* १ जून – गणित, राज्यशास्त्र

* २ जून – तर्कशास्त्र, पॉलिटिकल सायन्स

* ३ जून- अर्थ शास्त्र, जीव शास्त्र

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्रात ज्ञान व मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम

Spread the love    बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *