बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे दिनांक 11 जानेवारी ते 13 जानेवारी या तीन दिवसांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. या कार्यक्रमाला अनुक्रमे डाॅ. नम्रता मिसाळे, प्रा.हर्षदा सुंठणकर, श्री.राजकुमार पाटील सर हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. शाळेमध्ये दोन वर्षानंतर हे स्नेहसंमेलन संपन्न झाले.शाळा मुलांमध्ये पेरत असलेले विचार मुलांच्या विविध गुणदर्शनातून …
Read More »LOCAL NEWS
संत मीरा स्कूल गणेशपूर शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
बेळगाव : संत मीरा स्कूल गणेशपूर येथील विद्यार्थ्यांच्या सप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रिटायर कर्नल श्री. दीपक कुमार गुरूंग तसेच डॉ. सब्बाना तलवार (विधानपरिषद सदस्य), श्री. शांतिलाल पोरवाल (इंडस्ट्रियलीस्ट व शांती आयर्नचे मालक) हे होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन …
Read More »मोहनगा दड्डी येथील भावकेश्वरी यात्रा 6 फेब्रुवारीपासून
हुक्केरी : प्रतिवर्षीप्रमाणे माघ पौर्णिमेनंतर बेळगावसह, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवरील हुक्केरी तालुक्यातील मोदगे दड्डी (मोहनगा-दड्डी) भावकेश्वरी यात्रेला दि. ६ फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार आहे. तर ८ फेब्रुवारी रोजी पालखी सोहळ्याने यात्रेची सांगता केली जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि उत्तर कर्नाटक बेळगाव …
Read More »17 जानेवारीचा हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत आवाहन बेळगाव : हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात यावा तसेच सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून प्रयत्न करावेत. सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी केंद्र सरकारला जागे करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात “चलो मुंबई” आंदोलन छेडण्याचा विचार मध्यवर्तीच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर …
Read More »काँग्रेस प्रजाध्वनी यात्रा निवडणुकीसाठी स्टंटबाजी : भाजप नेत्यांचा आरोप
बेळगाव : काँग्रेसची प्रजाध्वनी यात्रा इलेक्शन पब्लिसिटी स्टंट आहे. निवडणूक आली म्हणून ३ महिने आधी ते जागे झालेत. नंतर ते गायब होतील, त्यांचा ध्वनीही गायब हिल आणि प्रजेलाही ते विसरतील अशी घणाघाती टीका भाजपने केली. बेळगावात एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार बोलताना आ. अनिल बेनके यांनी काँग्रेसच्या प्रजाध्वनी यात्रेची …
Read More »बेळगाव महापौर, उपमहापौर निवडणूक 6 फेब्रुवारीला
बेळगाव : बेळगाव महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 6 फेब्रुवारी 2023 ही निश्चित झाल्याचे प्रादेशिक आयुक्त डॉ. महांतेश हिरेमठ यांनी कळवले आहे. बेळगाव महानगर पालिकेची निवडणूक झाल्यास जवळपास सव्वा वर्ष उलटले आहे. मात्र महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा मुहूर्त काही लागत नव्हता. यासंदर्भात आमदारांनी देखील दोन वेळा निवडणूक …
Read More »किरण जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
बेळगाव : सकल मराठा समाजाचे संयोजक, भाजपाचे कर्नाटक राज्य ओबीसी सचिव किरण जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी, हितचिंतकांनी व कार्यकर्त्यांनी दिवसभरात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. न्यू गुड्सशेड रोड येथील विमल अपार्टमेंटच्या कार्यालयात सकाळी 11 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच …
Read More »मंगळवारी शनी पालट निमित्त शनी मंदिरात विविध कार्यक्रम
बेळगाव : मंगळवार दि. १७ जानेवारी रोजी शनी पालट होत असून शनी महाराज कुंभ राशीत प्रवेश करत आहे. तीस वर्षांच्या नंतर शनी कुंभ राशीत प्रवेश करत आहे. यामुळे धनू राशीची साडेसाती संपणार असून मोन राशीला साडेसाती सुरू होणार आहे. शनी पालट निमित्त बेळगाव येथील पाटील गल्ली येथील श्री शनेश्र्वर …
Read More »पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, सुरक्षा कवच तोडून तरुण कारजवळ पोहोचला
हुबळी : कर्नाटकातील हुबळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचे मोठे प्रकरण समोर आले आहे. येथे पंतप्रधान मोदींच्या रोड शो दरम्यान एक तरुण अचानक त्यांच्याकडे धावत आला आणि त्याच्या कारपर्यंत पोहोचला. खरे तर त्या तरुणाला पंतप्रधानांना फुलांचा हार घालायचा होता. त्यासाठी त्याने कोणताही विचार न करता एसपीजीचा …
Read More »प्रगतिशील लेखक संघात उद्या विवेकानंद जयंती
बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाची साप्ताहिक बैठक शुक्रवार दि. 13 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांचे स्वामी विवेकानंद : जीवन व कार्य या विषयावर व्याख्यान होणार आहे. गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली येथील भगतसिंग सभागृहात हा कार्यक्रम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta