बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाची साप्ताहिक बैठक शुक्रवार दि. 13 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांचे स्वामी विवेकानंद : जीवन व कार्य या विषयावर व्याख्यान होणार आहे. गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली येथील भगतसिंग सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यवाह कृष्णा शहापूरकर यांनी केले आहे.