बेळगाव : येथील विवेकानंद मल्टीपर्पज सोसायटीतर्फे दि.12 जानेवारी रोजी सोसायटीच्या कार्यालयात स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी अध्यक्ष कुमार पाटील व उपस्थित पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते विवेकानंदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर 11 सप्टेंबर रोजीचे स्वामी विवेकानंदांचे शिकागो मधील ऐतिहासिक भाषण व त्याच दिवशी नंतर अमेरिकेवर ओसामांनी केलेला आतंकवादी हल्ला, विवेकानंदांच्या बेळगाव भेटीच्या आठवणी व कै. मो. ग. कुंटेचे प्रवचन, विवेकानंद खऱ्या अर्थाने समजून घेताना तर राजमाता जिजाऊंच्या जीवनातील मोजके प्रसंग यावर किशोर काकडे, पत्रकार सुनील आपटे, प्रा.दत्ता नाडगौडा, नितीन कपिलेश्वरकर यांनी विचार मांडले.
कुमार पाटीलनी आभार मानत विवेकानंद सोसायटीच्या प्रगतीसाठी हातभार लावण्यासाठी आवाहन केले. अल्पोपहारानंतर कार्यक्रम संपला. संपूर्ण स्टाफ सौ. गवस आदिनी सुंदर व्यवस्था केली होती.