बेळगाव : संत मीरा स्कूल गणेशपूर येथील विद्यार्थ्यांच्या सप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रिटायर कर्नल श्री. दीपक कुमार गुरूंग तसेच डॉ. सब्बाना तलवार (विधानपरिषद सदस्य), श्री. शांतिलाल पोरवाल (इंडस्ट्रियलीस्ट व शांती आयर्नचे मालक) हे होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. स्वागतगीत तसेच नर्सरी मुलांनी गणपति स्तोत्र सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विविधतेत एकता ही थीम असल्यामुळे विविध राज्यांचे दर्शन विद्यार्थ्यांच्या कलागुणांतून सादर करण्यात आले. तसेच भगवद्गीता व संस्कृत नाटक ही सादर करण्यात आले. आर्मी डान्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला नर्सरी ते इयत्ता 6 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष डॉ. श्री. विजय गोवेकर, सेक्रेटरी श्री. देवीप्रसाद कुलकर्णी, श्री. रामनाथ नाईक, श्री. महेश नरगुंदकर, श्री. रमेश लड्डार, श्री. ग्रामोपाध्ये, मुख्याध्यापिका सौ. आरती पाटील व सर्व शिक्षक स्टाफ यांचे सहकार्य लाभले.