Sunday , July 26 2026
Breaking News

मोहनगा दड्डी येथील भावकेश्वरी यात्रा 6 फेब्रुवारीपासून

Spread the love

 

हुक्केरी : प्रतिवर्षीप्रमाणे माघ पौर्णिमेनंतर बेळगावसह, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवरील हुक्केरी तालुक्यातील मोदगे दड्डी (मोहनगा-दड्डी) भावकेश्वरी यात्रेला दि. ६ फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार आहे. तर ८ फेब्रुवारी रोजी पालखी सोहळ्याने यात्रेची सांगता केली जाणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि उत्तर कर्नाटक बेळगाव भागातील लाखो भाविक या देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी यात्रेला येत असतात. माघी पौर्णिमा, सोमवार ६ फेब्रुवारी २०२२ रोजी श्री लक्ष्मी देवी यात्रा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. यात्रोत्सव सोमवार दि. ६ ते ८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आला असून भाविकांना यात्रोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दि. ७ फेब्रुवारी रोजी मोदगा (मोहनगा – दड्डी) भावकेश्वर यात्रा आणि नैवेद्य होणार आहे. तरी भाविकांनी याची नोंद घेऊन देवीच्या दर्शनाचा व स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रोत्सव कमिटीतर्फे करण्यात आले आहे. घटप्रभा नदीला पाणी खूप असल्यामुळे भाविकांनी कृपया मोदगे बंधाऱ्यावरून वाहतूक करावी अशी सूचनाही आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *