बेळगाव (प्रतिनिधी) : उपसंचालक, पदवी पूर्व शिक्षण खाते बेळगाव आणि गोमटेश संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालय, हिंदवाडी-बेळगाव यांच्या संयुक्त सहयोगाने बेळगाव जिल्हास्तरीय पदवी पूर्व महाविद्यालयीन 2022-23 क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदवाडी येथील गोमटेश विद्यापीठात या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी घेण्यात आलेल्या सिलंबम्ब स्पर्धेत 35 ते 60 किलो वजनी गटात …
Read More »LOCAL NEWS
शाळकरी मुलाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक
बेळगाव : हुक्केरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुडस गावच्या हद्दीत हिरण्यकेशी नदीच्या पात्रात अज्ञात मुलाचा शिरविरहित मृतदेह आढळल्याच्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात हुक्केरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्याचे बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले. 20 सप्टेंबरपासून बेपत्ता झालेल्या मुलाच्या शोधार्थ गावातील अनेकांची चौकशी केल्यानंतर …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायतच्यावतीने विविध विकासकामांचे उद्घाटन
बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतच्यावतीने ग्राम पंचायतीच्या 15 व्या आयोगातून निधी मंजूर करून येळ्ळूर येथील विविध विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. येळ्ळूर येथील पाटील स्मशानभूमी, बाराभाव (विहीर), एससी स्मशानभूमी, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समुदाय भवन व उद्यान विकासकामांचे ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी तसेच गावातील ज्येष्ठ …
Read More »भरधाव वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू; हुक्केरी तालुक्यातील घटना
बेळगाव : भरधाव वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील होळेम्मा मंदिराजवळ घडली. सौंदत्ती तालुक्यातील चचडी गावातील मल्लनगौडा यल्लनगौडा पाटील (२२) आणि सिद्धारुद्ध वीरभद्र करोशी (२४) अशी मृतांची नावे आहेत. भरधाव वाहनाने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले …
Read More »श्री सरस्वती को- ऑप. सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
बेळगाव : श्री सरस्वती को- ऑप. सोसायटीची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 29/9/22 रोजी सरस्वती सभागृहात खेळमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रारंभी अध्यक्ष सुरेंद्र पाटणेकर, संचालक प्रकाश गोखले, सुरेश कनगली, रविंद्र लाड, राजाभाऊ चौगले, संस्थेचे कार्यवाह अनंत शानभाग यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. दिवंगत सभासदांना श्रद्धांजली …
Read More »बेळगावात छापा टाकून पीएफआयचे 7 जण ताब्यात
बेळगाव : देशभरातील पीएफआय संघटनेवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंगळवारी सकाळी बेळगावच्या विविध भागात अचानक छापे टाकून पीएफआयच्या 7 कार्यकर्त्यांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. बेळगाव पीएफआय जिल्हाध्यक्ष नावीद कटगी यांच्या नेतृत्वाखाली काकतीजवळ आंदोलन करण्यात आले. दरम्यान बेळगावातही पीएफआय संघटना सक्रिय असल्याची माहिती मिळताच डीसीपी रवींद्र …
Read More »कॅम्प परिसरातील एका युवकावर चाकू हल्ला
बेळगाव : कॅम्प परिसरातील एका युवकावर सोमवारी रात्री चाकू हल्ला करण्यात आला असून त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटना शहरातील अनंतशयन गल्लीत घडली. दुचाकीवरून जात असताना टोळक्याला धक्काबुक्की करण्यात आली. त्याच्यासोबत दुचाकीवर असलेला दुसरा व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाला. फरान (16) या विद्यार्थ्यावर चाकूने …
Read More »म्हैसूर दसऱ्याने भारतीय संस्कृतीचा गौरव वाढविला : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
जगप्रसिध्द म्हैसूर दसरा महोत्सवाचे शानदार उद्घाटन बंगळूर : म्हैसूर दसऱ्याने भारतीय संस्कृतीचा गौरव वाढविला आहे. जैन आणि बौद्ध वारसा कर्नाटकात विलीन झाला आहे. आदिशंकराचार्यांनी पीठाची स्थापना करून देशाची प्रतिष्ठा वाढवली. बसवण्णा यांनी अनुभव मंटपातून समता आणि लोकशाहीची कामना केली. अनुभव मंटपाच्या माध्यमातून आध्यात्मिक आणि सामाजिक चर्चा झाल्याचे देशाच्या प्रथम …
Read More »येळ्ळूर येथील लक्ष्मी तलाव स्वच्छता अभियान
बेळगाव : अगदी ग्रामपंचायतीपासून 50 ते 60 फुटांवर रस्त्यापलिकडे लागुन असलेल्या तलावाच्या आजूबाजूचा परिसर दारुप्रेमीनी खराब करून टाकलाय, गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी दारु विक्री, तसेच मद्यपान, धुम्रपान असे अनेक प्रकार होत आहेत, आणि आजूबाजूचा परिसर संपूर्णपणे दारुच्या पाकीटांनी, प्लॅस्टिक बाटल्या, प्लॅस्टिक ग्लास तसेच इतर कचर्यांनी साचलेला आहे. सूर्यास्तानंतर …
Read More »सासऱ्याच्या विरोधात जावयाची पोलिसात तक्रार
बेळगाव : सासऱ्याने जावयाला भररस्त्यात अर्वाच्य शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार जावयाने मार्केट पोलिस स्थानकात दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते अवधूत प्रशांत तुडयेकर (रा. बसवाण गल्ली बेळगांव) यांची पत्नी क्षुल्लक कारणावरून भांडण करून माहेरी गेली आहे. सासरे विजयसिंह गायकवाड (रा. पुणे) हे अवधूत यांना त्यांच्या पत्नीशी फोनवर संपर्क …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta