Monday , September 21 2026
Breaking News

सासऱ्याच्या विरोधात जावयाची पोलिसात तक्रार

Spread the love

 

बेळगाव : सासऱ्याने जावयाला भररस्त्यात अर्वाच्य शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार जावयाने मार्केट पोलिस स्थानकात दिली आहे.

सामाजिक कार्यकर्ते अवधूत प्रशांत तुडयेकर (रा. बसवाण गल्ली बेळगांव) यांची पत्नी क्षुल्लक कारणावरून भांडण करून माहेरी गेली आहे. सासरे विजयसिंह गायकवाड (रा. पुणे) हे अवधूत यांना त्यांच्या पत्नीशी फोनवर संपर्क देखील करू देत नाहीत. अवधूत हे दि. 30 ऑगस्ट रोजी खंजर गल्लीतून आपल्या घराकडे जात असताना विजयसिंह गायकवाड यांनी अवधूत यांना अर्वाच्य शिवीगाळ करत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गायकवाड यांनी रीतसर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडयेकर यांनी मार्केट पोलीस ठाण्यात दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *