Monday , September 21 2026
Breaking News

शाळकरी मुलाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

Spread the love

बेळगाव : हुक्केरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुडस गावच्या हद्दीत हिरण्यकेशी नदीच्या पात्रात अज्ञात मुलाचा शिरविरहित मृतदेह आढळल्याच्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात हुक्केरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्याचे बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले.

20 सप्टेंबरपासून बेपत्ता झालेल्या मुलाच्या शोधार्थ गावातील अनेकांची चौकशी केल्यानंतर दोघाना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडून कसून चौकशी केल्यानंतर त्याने हिरण्यकेशी नदीच्या पात्रात सापडलेल्या शाळकरी मुलाचा खून केल्याची कबुली दिली. सदर प्रकरणात पुरावे मिटवण्यासाठी आरोपीला त्याच्या मित्रानेही मदत केल्याची माहिती मिळाली. सदर प्रकरणी आरोपी विरोधात भादवी कलम 302,201 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महालिंग नंदगावी, गोकाकचे डीएसपी मनोज कुमार नाईक यांच्यासह हुकेरी आणि यमकनमर्डी पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांचेही जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *