Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

कलबुर्गी हत्या प्रकरण; स्वतंत्र साक्षीदाराने दुचाकीस्वाराची ओळख पटविली

  बंगळूर : ज्येष्ठ विद्वान एम. एम. कलबुर्गी यांच्या खून खटल्यातील एका स्वतंत्र साक्षीदाराने शनिवारी धारवाड येथील सत्र न्यायालयात खटल्याच्या सुनावणीदरम्यान एका मोटार सायकलस्वाराची ओळख पटवली, ज्याने गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला कलबुर्गी यांच्या घरी आणले होते. कलबुर्गी यांच्या घरासमोर एक छोटेसे दुकान असलेल्या साक्षीदाराने प्रवीण चतुरला २०१५ मध्ये खून झाला तेव्हा …

Read More »

वडगाव सपार गल्लीत घर कोसळले: सुदैवाने दाम्पत्य बचावले वृद्ध

  बेळगाव : बेळगाव शहरात मुसळधार पावसामुळे घर कोसळल्याची घटना सपार गल्ली येथे घडली असून घरात राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याचा सुदैवानेच जीव वाचला. बेळगाव शहरात गेले काही दिवस सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातील वडगाव सपार गल्ली येथे एक जुने घर कोसळले. या घटनेत एक वृद्ध जोडपे सुदैवाने बचावले आहेत. …

Read More »

श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर आदर्श धार्मिक पर्यटनस्थळ बनवणार

  आ. श्रीमंत पाटील ; मंगसुळीत मंदिर जीर्णोद्धारसह साडेचार कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन अथणी : मंगसुळी गावच्या विकासासाठी तसेच येथील श्री क्षेत्र खंडोबा देवा मंदिरासाठी अधिकाधिक निधी आणून विकास केला जात आहे कर्नाटक महाराष्ट्रसह अन्य राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा मंदिर एक आदर्श धार्मिक पर्यटन स्थळ बनवू, असा विश्वास माजी …

Read More »

बडेकोळमठ क्रॉसजवळ बस उलटून 5 प्रवाशी जखमी

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बडेकोळमठ क्रॉसजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर सरकारी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती उलटली. बसमध्ये 35 प्रवासी होते. बेळगावहून हिरेकेरूरकडे निघालेल्या बसवरील बडेकोळमठ क्रॉसजवळील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना बेळगाव …

Read More »

राष्ट्रीय एकतेसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धा

  बेळगाव : बेळगाव येथील मराठा लाईट इंन्फट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे शालेय विद्यार्थ्यासाठी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मराठा लाईट इंन्फट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी ध्वज दाखवून मिनी मॅरेथॉन स्पर्धेला चालना दिली. बेळगावातील विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान आणि देशभक्तीची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले …

Read More »

पूर मदत कार्यासाठी 200 कोटी; जिल्हा प्रशासनाशी मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ संवाद

  बंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सायंकाळी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा संपर्क साधून पूर परिस्थिती बाबत चर्चा केली. पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या त्यांनी सूचना केल्या. बैठकीत पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्य नैसर्गिक आपत्ती निवारण निधी अंतर्गत २०० कोटी रुपये मंजूरीचा आदेश दिला. बेळ्ळारी, चित्रदुर्ग, …

Read More »

मराठा समाज विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा : मनोहर कडोलकर

  बेळगाव : कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळाच्या वतीने राज्यभरातील मराठा समाजातील बेरोजगार आणि विद्यार्थ्यांसाठी श्री शहाजीराजे समृद्धी योजना तसेच स्वातंत्र्य अमृत महोत्सव प्रोत्साहन योजना जाहीर करण्यात आली आहे. सदर योजने अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 19 ऑगस्ट पर्यंत आहे. त्यामुळे बेळगाव आणि उत्तर कर्नाटकातील मराठा समाजातील लाभार्थ्यांनी सदर योजनेचा …

Read More »

प्रबुद्ध भारततर्फे 7 रोजी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रम

  बेळगाव : प्रबुद्ध भारत बेळगावतर्फे रविवार दि. 7 रोजी रात्री 8.30 वाजता भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. टिळक चौक येथे होणार्‍या या कार्यक्रमात भारतमातेचे पूजन, निवृत्त जवान सिद्धाप्पा चांगू उंदरे, कारगिल युद्धातील हुतात्मा भरत मस्के यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मी भरत मस्के यांचा सत्कार होणार आहे. पूज्य …

Read More »

अन्यथा बेजबाबदार अधिकाऱ्यांची गय नाही

आ. श्रीमंत पाटील : संबरगी जनसंपर्क सभेत अधिकाऱ्यांना कडक सूचना अथणी : गटारी पाणी यासह सर्वसामान्यांना अनेक समस्या असू शकतात समस्या कोणतीही असो, एखादी सामान्य व्यक्ती अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांची समस्या तातडीने सोडवा अन्यथा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. संबर्गी …

Read More »

शामरंजन फाऊंडेशच्या पुरस्कारांचे वितरण १६ रोजी

  बेळगावात, पद्मश्री डॉ. कोल्हे यांची उपस्थिती बेळगाव : शामरंजन बहुउद्देशीय फाऊंडेशन मुंबई व विद्यार्थी विकास अकादमी, महाराष्ट्र यांच्यावतीने कला, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्ती व संघटना यांचा सन्मान सोहळा १६ रोजी सकाळी ११ वाजता बेळगावात संपन्न होणार आहे. ‘राष्ट्रीय संस्कृती संगम संमेलन, बेळगाव २०२२’ बॅनर अंतर्गत …

Read More »