Sunday , July 26 2026
Breaking News

शामरंजन फाऊंडेशच्या पुरस्कारांचे वितरण १६ रोजी

Spread the love

 

बेळगावात, पद्मश्री डॉ. कोल्हे यांची उपस्थिती
बेळगाव : शामरंजन बहुउद्देशीय फाऊंडेशन मुंबई व विद्यार्थी विकास अकादमी, महाराष्ट्र यांच्यावतीने कला, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्ती व संघटना यांचा सन्मान सोहळा १६ रोजी सकाळी ११ वाजता बेळगावात संपन्न होणार आहे. ‘राष्ट्रीय संस्कृती संगम संमेलन, बेळगाव २०२२’ बॅनर अंतर्गत होणारा कार्यक्रम लोकमान्य रंगमंदिर रिझ टॉकीज, कोनवाळ गल्ली बेळगाव संपन्न होणाऱ्या कार्यक्रमास थोर समाजसेवक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांची महत्त्वपूर्ण उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात भारत कर्तव्य समाज भूषण पुरस्कार, शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप पुरस्कार, राष्ट्रीय लोकप्रतिमा पुरस्कार, राष्ट्रीय संस्कृती भूषण पुरस्कार, महाराष्ट्र- कर्नाटक मानवता पुरस्कार, महाराष्ट्र- कर्नाटक शौर्य पुरस्कार आदी पुरस्कारांचे वितरण यावेळी होणार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमापूर्वी “गोवा येथील सुप्रसिद्ध जादूगार प्रेम आनंद पाटील” यांचा नेत्रदीपक असे प्रेक्षकांना जागेवर खिळवून टाकणारे जादूचे प्रयोग होणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक डाॅ. बी. एन. खरात (९४२११८९८२१) केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *