Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

रेडक्रॉसकडून मराठा सेंटरला 57 हजार फेसमास्क

  बेळगाव : कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर इंडियन रेड क्रॉस सोसायटी बेळगाव शाखेतर्फे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, जेएल विंग आणि मिलिटरी हॉस्पिटल यांना एकूण 57 हजार इम्पोर्टेड पुनर्वापर करता येणारे फेसमास्क आज देणगी दाखल देण्यात आले. भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या बेळगाव शाखेतील रेड क्रॉस राज्य व्यवस्थापन …

Read More »

सदाशिवनगर भागातील क्रॉसवरील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने नागरिक संतप्त

बेळगाव : बेळगावमधील सदाशिवनगर भागातील क्रॉसवरील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने या परिसरातील वीजपुरवठा नेहमी खंडित होत असतो. यामुळे या परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सदाशिवनगरच्या शेवटच्या क्रॉसवर असलेल्या ट्रान्सफॉर्मरची नादुरुस्ती कायमची डोकेदुखी बनली आहे. पावसाळ्यात देखील या भागातील नागरिकांना वीजपुरवठा सुरळीतरीत्या मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या परिसरात …

Read More »

राष्ट्रध्वज पॉलिस्टरचा बनविण्याच्या निर्णयास विरोध करण्याची गरज

  बेळगाव : तिरंगा ध्वज हा केवळ काठी व कापडाचा नाही. त्याला मोठा इतिहास आहे. लाखो भारतीयांच्या त्यागातून त्याची निर्मिती झाली असून तो देशाची शान व अभिमान आहे. यासाठी तो पॉलिस्टरचा बनविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला जनतेने विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन गांधीवादी अशोकभाई देशपांडे यांनी केले. प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी …

Read More »

अंशतः विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा संततधार

  बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने काल शुक्रवारी काही अंशी विश्रांती घेतली. बऱ्याच दिवसानंतर बेळगाव परिसरातील नागरिकांना सूर्यदर्शनही घडले. मात्र त्यानंतर सायंकाळी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. रात्रीही दमदार पावसाच्या सरी कोसळल्या. आज शनिवारी सकाळपासूनच पुन्हा एकदा संततधार पावसाने सुरुवात केली आहे. प्रशासनाने पावसामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ …

Read More »

चालकाचा ताबा सुटल्‍याने कार थेट दूधगंगा नदीपात्रात, बेळगाव जिल्ह्यातील दुर्घटना

चिकोडी : चिकोडी तालुक्यातील एकसंबा येथे दूधगंगा नदीपात्रावर वाहन चालकाचा ताबा सूटून एरटीगा कार नदीत पडली. पुण्याहुन भाडे घेऊन बेळगावाला गेलेली एमएच 09 यु एफ 5087 क्रमांकाची एर्टीगा कार, भाडे सोडून परत पुण्याकडे जात होती. सदर गाडी आज (दि.15) पहाटे एकसंबाकडून दानवाडकडे जात असताना एकसंबा – दानवाड पुलानजीक वळण घेताना …

Read More »

पायाभूत सुविधांच्या कामांसाठी ५०० कोटी तातडीने मंजूर

मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद, मदत कार्यासाठी सक्त सूचना बंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी पायाभूत सुविधा पुनर्संचयित करण्यासाठी ५०० कोटी रुपये मंजूरीचे आदेश जारी केले. मुख्यमंत्र्यांनी पाऊस आणि पूर परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली आणि परिस्थिती जाणून घेतली. पायाभूत सुविधा जलद गतीने पुनर्संचयित करणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना त्यांनी …

Read More »

त्रिसूत्रीचा अवलंब करून महिलांनी आपले आरोग्य टिकवावे

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संचलित येथील भाऊराव काकतकर महाविद्यालयात स्त्रियांच्या समस्या व उपाय या विषयावर पॅथॉलॉजिस्ट डॉ. आसावरी संत यांचे व्याख्यान पार पडले. योग्य आहार, व्यायाम आणि योगासन या त्रिसूत्रीचा अवलंब करून महिलांनी आपले आरोग्य कशा पद्धतीने टिकवावे याबद्दल मार्गदर्शन केले. स्त्रियांना जाणवणाऱ्या अडचणी व आरोग्याच्या समस्या याबद्दल विचारण्यात …

Read More »

एकीकरण समिती नेत्यांकडून किरण पाटील यांचे अभिनंदन

  बेळगाव : मुतगा ग्रामपंचायत अध्यक्षपदी म. ए. समितीची सत्ता कायम राहिली असून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कट्टर समर्थक किरण पाटील हे ग्रामपंचायत अध्यक्षपदीच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मोठ्या उत्साहात किरण पाटील यांचे स्वागत केले. शिवाय समितीच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचा वर्षाव देखील केला. किरण पाटील विजयी होताच …

Read More »

मुतगा ग्रामपंचायत अध्यक्षपदी किरण पाटील

बेळगाव : मुतगा ग्रामपंचायत अध्यक्षपदी म. ए. समितीची सत्ता कायम राहिली असून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कट्टर समर्थक किरण पाटील हे ग्रामपंचायत अध्यक्षपदीच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. मावळते अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी अडीच पैकी सव्वा वर्षाची अध्यक्षपदाची टर्म झाल्यानंतर राजीनामा दिला होता त्यानंतर ही निवडणूक झाली. आणखी सव्वा वर्षासाठी किरण पाटील …

Read More »

नगरसेवक आनंद चव्हाण यांचा स्तुत्य उपक्रम

बेळगाव : वॉर्ड क्रमांक 44 मधील नगरसेवक आनंद चव्हाण यांनी लेले ग्राउंड परिसरातील रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजविले. बेळगाव शहरात बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचले आहे त्यामुळे या रस्त्यावर छोटेमोठे अपघात …

Read More »