Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

आमची प्राथमिकता केवळ विकासाला, ‘व्होट बँके’ला नाही

  पंतप्रधान नरेंद्र मोदी; यादगीर जिल्ह्यात विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी भाजप सरकारचे प्राधान्य केवळ विकासाला असल्याचे प्रतिपादन केले. कर्नाटकावर राज्य केलेल्या इतर पक्षांच्या सरकारांनी केवळ “व्होट बँक”चे राजकारण केल्याचा आरोप करून राज्यातील काही प्रदेशांच्या मागासलेपणासाठी त्यांच्यावर निशाणा साधला. यादगीर जिल्ह्यातील कोडेकल येथे राष्ट्रीय …

Read More »

शारदा हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा उत्साहात प्रारंभ!

बेळगाव : हालगा येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित शारदा हायस्कूलमध्ये 39 व्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ झाला. संस्थेचे चेअरमन श्री. विजय अर्जुन लोहार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात झाली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. वडगाव येथील मंगाई सौहार्द सोसायटी नियमितचे चेअरमन श्री. सतीश शिवाजी पाटील प्रमुख …

Read More »

बेळगावात 21 ते 24 जानेवारीदरम्यान आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव!

  बेळगाव : 21 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान बेळगावकरांना आंतराष्ट्रीय पतंग महोत्सवाची अनुभूती घेता येणार आहे. रंगीबेरंगी व आकर्षक पतंगांनी आकाश सजणार आहे. दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या वतीने बेळगाव शहरातील मालिनी सिटी मैदानावर 11 व्या भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावातील एका खाजगी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार …

Read More »

अथणी येथे वीज केंद्रात भीषण आग

  अथणी : येथील 110 केव्ही वीज केंद्रात भीषण आग लागली आहे. सदर आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर पसरून संपूर्ण वीज केंद्राला आगीने वेढले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अथणी शहरातील विजापूर रोडला जोडलेल्या वीज केंद्रात सकाळी 09.15 च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात …

Read More »

विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यावश्यक : चित्रपट निर्माते-अभिनेते चरणराज

  बेळगाव : विद्यार्थ्यांना चांगले जीवन जगायचे असेल आणि चांगले नागरिक बनायचे असेल तर शिक्षकांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे मत प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेते चरणराज यांनी व्यक्त केले. बेळगाव येथील भरतेश शिक्षण संस्थेच्या डी. वाय.चौगुले भरतेश हायस्कूलच्या हीरक महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. मुलांना बालवयातच दर्जेदार शिक्षण मिळाले तर …

Read More »

बालहक्क आणि संरक्षणासंदर्भात के. नागनगौडा यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

  बेळगाव : लैंगिक हिंसा, कुपोषण, बालविवाह, बालमजुरी, भीक मागणे यासह विविध कायदेशीर संघर्षांमधील मुलांची ओळख पटवून त्यांना मुख्यप्रवाहात आणणे तसेच मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासंदर्भात कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष के. नागनगौडा यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. बुधवारी जिल्हा पंचायत सभागृहात बाल न्यायालय कायदा, आर.टी.ई., बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून …

Read More »

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एक ठार

  बेळगाव : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात मृत व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 आहे. बेळगाव उज्वल नगर जवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना हा भीषण अपघात घडला. पुण्याहून बेंगळुरूच्या दिशेने निघालेल्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात व्यक्तीने धडक दिल्याची माहिती स्थानिकांनी …

Read More »

पीडीओ अरुण नायक हेच कायम रहावेत; येळ्ळूर भाजपा ग्रामपंचायत सदस्यांचे निवेदन

  बेळगाव : येळ्ळूर भाजपा ग्रामपंचायत सदस्याच्या वतीने येळ्ळूर गावासाठी पी.डी.ओ. अरुण नायक हेच कायम रहावेत. यासाठी बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी दर्शन एच. व्ही. यांना बुधवार (ता. 18) रोजी निवेदन देण्यात आले. येळ्ळूर भाजपा ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने, तसेच गावातील काही सुज्ञ नागरिकांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. या …

Read More »

मर्चंट्स सोसायटीच्या वतीने प्रदीप अष्टेकर यांचा सत्कार

  बेळगाव : अनसूरकर गल्ली येथील दि. बेळगाव मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने पायोनियर अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांचा सत्कार करण्यात आला. मंगळवारी सोसायटीच्या सभागृहात झालेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन नारायण चौगुले हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा बँकेचे संचालक आणि माजी चेअरमन बाळासाहेब काकतकर तसेच समर्थ …

Read More »

कंग्राळ गल्लीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर

  बेळगाव : येथील विजया ऑर्थो आणि ट्राॅमा सेंटरचे डाॅ. रवि बी. पाटील (एम एस ऑर्थो) आणि सहकारी यांच्यावतीने कंग्राळ गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होते. या शिबिरात ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक यांच्या संपूर्ण शरीराची तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखर, हाडातील खनिजांची घनता इत्यादी …

Read More »