Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

पंढरपूरजवळ झालेल्या अपघातात बेळगावच्या दोघांचा मृत्यू

बेळगाव : बेळगावमधील अनगोळ येथील पाच भाविक सेल्टोस गाडीने पंढरपूरकडे येत असताना रविवारी पहाटे कासेगाव फाटा (ता. पंढरपूर) येथे अपघात झाला. या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातात राजू संभाजी शिंदोळकर (वय ४५, रा. अनगोळ, ता. बेळगाव), परशुराम संभाजी झंगरूचे (वय ५० …

Read More »

अमरनाथ येथील ढगफुटीतून बेळगावचे दोन भाविक बचावले

बेळगाव : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीच्या आपत्तीतून सांगलीचे रवींद्र काळेबेरे व बेळगावचे विनोद काकडे हे दोन यात्रेकरू बचावले आहेत. प्रसंगावधान राखत तंबूतून बाहेर पळत सुरक्षित ठिकाणी गेल्‍याने ते दुर्घटनेतून बचावले. सांगली, कोल्हापूर, शिरोळ, जयसिंगपूर तसेच सातारा, पुणे, बेंगलोर, बेळगाव येथील ५० यात्रेकरूंनी अमरनाथ यात्रा अर्ध्यावर सोडून परतीचा मार्ग धरला आहे, अशी …

Read More »

साई ज्योती सेवा संघाकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

बेळगाव : आज स्पंदनवन मक्कळधाम येथे कुमार धीरज दीपक चडचाळ याचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने साई ज्योती सेवा संघाकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना ज्योती निलजकर म्हणाल्या की, साई ज्योती सेवा संघ ही नेहमीच सामाजिक बांधिलकी जपून कार्य करणारी संस्था आहे. यावेळी उपसंचालिका ज्योती बाके, …

Read More »

राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत 8 फुटाने वाढ

बेळगाव : बेळगाव शहराची तहान भागविणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत 8 फुटाने वाढ झाली आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे राकसकोप पाठोपाठ हिडकल जलाशयात देखील पाण्याची पातळी वाढलेली पाहायला मिळत आहे. संततधार पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयात तीन टीएमसीने वाढ झालेली आहे. पाणीपुरवठा मंडळाकडून मिळालेल्या …

Read More »

शहापूर, वडगाव, खासबाग भागात डुकरांचा हैदोस; पालिकेचा हलगर्जीपणा

बेळगाव : बेळगाव शहराची वाटचाल स्मार्टसिटीकडे चालू असल्याचे भासवले जात आहे. बेळगावची निवड स्मार्टसिटीमध्ये झालेली आहे. शहराच्या प्रमुख रस्त्यांवर स्वच्छ आणि सुंदर बेळगावच्या दृष्टीने कामही चालू झालेले आहे. मात्र बेळगाव दक्षिणमधील शहापूर, वडगाव, खासबाग या भागाची मात्र उकिरडा सिटी झाली आहे. खासबाग, वडगाव परिसरात बहुतेक ठिकाणी कचरा उघड्यावर पडत आहे. …

Read More »

समुदाय भवनासाठी अनुदान सुपूर्द

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील करडीगुद्दी येथे पंचवीस लाखाच्या अनुदानातून बसवेश्वर मंदिर व समुदाय भवन बांधण्यात येणार आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पहिल्या टप्प्यातील काही रक्कम समुदाय भावनासाठी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील निधी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी मंदिर पंच कमितीकडे धनादेश स्वरूपात सुपूर्द केला आहे. यावेळी तालुका समितीचे …

Read More »

बेळगावातील काँग्रेस नेत्यांनी घेतली डी. के. शिवकुमारांची भेट

बेळगाव : बेळगावातील काँग्रेसच्या प्रभावशाली नेत्यांनी आज केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानी भेट देऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा केली. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि आमदार प्रकाश हुक्केरी यांनी आज डी. के. शिवकुमार यांची त्यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानी भेट घेऊन सध्याच्या …

Read More »

पश्चिम घाटात जोरदार पाऊस; चिकोडी तालुक्यातील पूल जलमय, जिल्ह्यात येलो अलर्ट

बेळगाव : महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला असून सीमावर्ती बेळगाव जिल्ह्यातही तो सुरूच आहे. चिक्कोडी तालुक्यातील येडूर-कल्लोळ, मलिकवाड-दत्तवाड, कारदगा-भोज हे पूल वजा बंधारे पाण्याखाली गेले असून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगावातील आपल्या कार्यालयात शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले …

Read More »

रांगोळीतून रेखाटली ‘पंढरपूरची वारी’!

बेळगाव : रांगोळीतून आषाढी एकादशी निमित्ताने गेली 2 वर्ष झाली कोरोनाचे महासंकटाने वारकरी संप्रदायाची ओढ लागली असल्याने यावर्षी श्री विठ्ठल व वारकरी भक्त ‘पंढरपूरची वारी’ (भेटी लागी जीवा) यांचे 2 फूट बाय 3 फूट आकाराची रांगोळी रेखाटलेली आहे. बेळगावचे रांगोळी कलाकार फोटोग्राफर अजित महादेव औरवडकर यांनी ज्योती फोटो स्टुडिओ वडगावमध्ये …

Read More »

उद्या मद्य विक्री दुकाने बंद!

बेळगाव : रविवार दि. 10 जुलै रोजी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम राहावी. कोणतीही अनुसूचित घटना घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी शहर व तालुक्यातील सर्व मद्य विक्री दुकाने बंद राहतील, असा आदेश पोलीस आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा न्यायदा दंडाधिकारी डॉ. एम. बी. बोर्लिंगय्या यांनी जरी केला …

Read More »