Thursday , June 4 2026
Breaking News

राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत 8 फुटाने वाढ

Spread the love

बेळगाव : बेळगाव शहराची तहान भागविणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत 8 फुटाने वाढ झाली आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे राकसकोप पाठोपाठ हिडकल जलाशयात देखील पाण्याची पातळी वाढलेली पाहायला मिळत आहे. संततधार पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयात तीन टीएमसीने वाढ झालेली आहे. पाणीपुरवठा मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी राकसकोपची पाणीपातळी 2,458 फूट झाली हाती मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी तब्बल 11 फुट पाणी पातळी कमी आहे. पावसाचा जोर वाढल्यास आठवडा भरात जलाशयाची पातळी आणखी दहा फुटांनी वाढण्याची शक्यता आहे. हिडकल जलाशयातील पाणीसाठा नऊ टीएमसी झाला आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला जलाशयात सहा टीएमसी पाणी होते. या आठवड्यात तीन टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. मागील वर्षी यंदाच्या तुलनेत हिडकल जलाशयात सोळा टीएमसीने पाणीसाठा जास्त होता. मागील वर्षी जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पाणीसाठा टिकून राहिला होता.
राकसकोप जलाशयात पाणीसाठा वाढत आहे मात्र वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पाणीपुरवठयात व्यत्यय येत आहे. गुरुवारी सायंकाळी हिडकल येथील हेस्कॉम उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे हिडकल जलाशयातील पाण्याचा उपसा थांबला होता. याची बातमी पाणीपुरवठा मंडळाला मिळाल्यानंतर हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला त्यानंतर पाण्याचा उपसा झाला. परंतु सहा तास वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शुक्रवारी शहराच्या काही भागात अपुरा पाणी पुरवठा झाला.

About Belgaum Varta

Check Also

डी. के. शिवकुमार मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच बेळगावात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

Spread the love  मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली विजयोत्सव; राणी चन्नम्मा चौकात फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *