Monday , December 15 2025
Breaking News

LOCAL NEWS

समुदाय भवनासाठी अनुदान सुपूर्द

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील करडीगुद्दी येथे पंचवीस लाखाच्या अनुदानातून बसवेश्वर मंदिर व समुदाय भवन बांधण्यात येणार आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पहिल्या टप्प्यातील काही रक्कम समुदाय भावनासाठी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील निधी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी मंदिर पंच कमितीकडे धनादेश स्वरूपात सुपूर्द केला आहे. यावेळी तालुका समितीचे …

Read More »

बेळगावातील काँग्रेस नेत्यांनी घेतली डी. के. शिवकुमारांची भेट

बेळगाव : बेळगावातील काँग्रेसच्या प्रभावशाली नेत्यांनी आज केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानी भेट देऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा केली. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि आमदार प्रकाश हुक्केरी यांनी आज डी. के. शिवकुमार यांची त्यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानी भेट घेऊन सध्याच्या …

Read More »

पश्चिम घाटात जोरदार पाऊस; चिकोडी तालुक्यातील पूल जलमय, जिल्ह्यात येलो अलर्ट

बेळगाव : महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला असून सीमावर्ती बेळगाव जिल्ह्यातही तो सुरूच आहे. चिक्कोडी तालुक्यातील येडूर-कल्लोळ, मलिकवाड-दत्तवाड, कारदगा-भोज हे पूल वजा बंधारे पाण्याखाली गेले असून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगावातील आपल्या कार्यालयात शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले …

Read More »

रांगोळीतून रेखाटली ‘पंढरपूरची वारी’!

बेळगाव : रांगोळीतून आषाढी एकादशी निमित्ताने गेली 2 वर्ष झाली कोरोनाचे महासंकटाने वारकरी संप्रदायाची ओढ लागली असल्याने यावर्षी श्री विठ्ठल व वारकरी भक्त ‘पंढरपूरची वारी’ (भेटी लागी जीवा) यांचे 2 फूट बाय 3 फूट आकाराची रांगोळी रेखाटलेली आहे. बेळगावचे रांगोळी कलाकार फोटोग्राफर अजित महादेव औरवडकर यांनी ज्योती फोटो स्टुडिओ वडगावमध्ये …

Read More »

उद्या मद्य विक्री दुकाने बंद!

बेळगाव : रविवार दि. 10 जुलै रोजी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम राहावी. कोणतीही अनुसूचित घटना घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी शहर व तालुक्यातील सर्व मद्य विक्री दुकाने बंद राहतील, असा आदेश पोलीस आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा न्यायदा दंडाधिकारी डॉ. एम. बी. बोर्लिंगय्या यांनी जरी केला …

Read More »

अमरनाथमध्ये अडकलेल्या राज्यातील नागरिकांना वाचवण्यासाठी उपाय : मुख्यमंत्री बोम्मई

बेंगळुर : अमरनाथ यात्रेत राज्यातील 100 हून अधिक कन्नडिग सहभागी झाले असून ते सुरक्षित आहेत. आम्ही तिथल्या राज्य सरकारच्या सतत संपर्कात आहोत आणि बचावकार्य सुरू आहे बसवराज बोम्मई यांनी सांगितले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरूमधील त्यांच्या आरटी नगर निवासस्थानी शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, अमरनाथ यात्रेदरम्यान ढगफुटीमुळे 15 लोकांचा …

Read More »

बेळगाव जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का

बेळगाव : बेळगाव जिल्ह्याला आज सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. त्यामुळे काहीप्रमाणात चिंतेत होते. शनिवारी पहाटे अथणी तालुक्यातील शिरहट्टी गावात भूकंपाचा हलका धक्का बसला. महाराष्ट्रजवळच्या सीमेवर असलेल्या शिरहट्टी गावाला आज सकाळी 6.22 च्या सुमारास पृथ्वी हादरली आणि लोकांना धक्का बसला. कोणतेही नुकसान झाले नाही. सुमारे पाच ते सहा सेकंद जमीन …

Read More »

प्रशासकीय कागदपत्रे मराठीतून मिळावीत यासाठी तालुका समिती युवा आघाडी सक्रिय होणार

बेळगाव : भाषिक अल्पसंख्यांक खात्याचे कार्यालय मुंबई येथे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी यशस्वी पाठपुरावा केलेल्या युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, खानापूर युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील आणि पियुष हावळ यांचे अभिनंदन तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांचे अभिनंदनाचे ठराव बेळगाव …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायत ठरली बेळगाव जिल्ह्यातील सक्रिय ग्राम पंचायत

बेळगाव : नुकत्याच बेंगळूर येथील विकास सौधमध्ये शुक्रवार दि. 08/07/2022 रोजी कर्नाटक राज्यातील 30 जिल्ह्यातील 30 ग्राम पंचयातच्या अध्यक्ष व पिडिओ यांना बेंगळूर येथे बोलावून पुढील पाच वर्षाचा ग्राम पंचायत दूरदृष्टी कृती आरखाडा या योजनेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातून एकमेव येळ्ळूर ग्राम पंचायतीचा समावेश आहे. यावेळी एल. के. …

Read More »

मुंबईत सुरू होणार भाषिक अल्पसंख्याक कार्यालय; म. ए. समितीच्या मागणीला यश

बेळगाव : भाषिक अल्पसंख्यांक खात्याचे कार्यालय मुंबई येथे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गेल्या कांही वर्षापासूनची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागणीची पूर्तता होणार आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाने असा आदेश बजावला आहे. 1971 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भाषिक अल्पसंख्यांक खात्याचे कार्यालय बेळगाव येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला …

Read More »