Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

एन. ओ. चौगुले नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने सन्मानीत

  बेळगाव : उचगाव येथील मळेकरणी हायस्कूलमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेले आणि सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात गेली 50 वर्षे कार्यरत राहिल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन “नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी आणि अंतरराज्य पुरस्कार वितरण समिती” चिकोडी यांच्या विद्यमाने कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यातून …

Read More »

सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांची पतंग उडवण्याबाबत जनजागृती

  बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये पतंग उडविण्याबाबत जनजागृतीचा उपक्रम सदाशिव नगर येथे राबविला आहे. सध्या अनेक शाळांना सुट्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी पतंग उडविण्याचा आनंद लुटत आहेत. पण विद्युत खांबाच्या तारांवर, झाडांच्या फांद्यामध्ये पतंग अडकणे तसेच घराच्या छतावर पतंग उडवणे धोकादायक ठरू शकते. नुकतेच अशोकनगरमध्ये एका …

Read More »

हर्षा साखर कारखान्यात इथेनॉल विभागाचे उद्घाटन, बॉयलर प्रदीपन

सौंदत्ती : सौंदत्ती येथील हर्षा साखर करखान्यात शुक्रवारी 100 केएल क्षमतेच्या इथेनॉल विभागाचे उद्घाटन, बॉयलर प्रदीपन व केन कॅरिअर पूजनाचा कार्यक्रम पार पडला. हुली मठाचे उमेश्वर महास्वामी संबय्यनवरमठ यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवठा करणार्‍या 10 शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला. 2021-22 यावर्षी ज्या शेतकर्‍यांनी ऊस पुरवठा केला आहे …

Read More »

गणेश दुध संकलन केंद्राकडून प्रतिलिटर 1.60 पैश्यांची वाढ

  संचालक उमेश देसाई यांची माहिती बेळगाव : गणेश दुध संकलन केंद्राच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून गाईच्या दुधात प्रतिलीटर 1.60 पैश्यांची वाढ केल्याची माहिती गणेश दूध संकलन केंद्राचे संचालक उमेश देसाई यांनी दिली. बेळगांव वेंगुर्ला मार्गावरील बेळगुंदी क्रॉस येथील गणेश दूध संकलन केंद्रात झालेल्या बैठकीत दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. यावेळी …

Read More »

सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022

  बेळगाव : सार्वजनिक सार्वजनिक शिक्षण खाते बेळगावी आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शालेय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी 2022 चे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोजी केएलई सोसायटीच्या स्केटिंग रिंक लिंगराज कॉलेज कॅम्पस बेळगाव येथे 14 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा उत्साहात

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा उत्साहात पार पडली. प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त प्राचार्य व्ही. एन. जोशी उपस्थित होते. व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष विनायक घोडेकर, सचिव मालतेश पाटील, खजिनदार रामचंद्र तिगडी, प्रांत सेक्रेटरी स्वाती घोडेकर, प्रांत समूहगायन संयोजक विनायक मोरे उपस्थित होते. प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदेमातरम् …

Read More »

सुळेभावी दुहेरी हत्या प्रकरण : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन पोलिस निलंबित

  बेळगाव : मारिहाळ पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल बी. एस. बाळगन्नावर आणि पोलिस हवालदार आर. एस. ठालेवाडे यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील सुळेभावी गावात 6 ऑक्टोबरच्या रात्री दोन गटात मारामारी सुरू असल्याची माहिती या दोन्ही पोलिस कर्मचार्‍यांना दिली असता त्यांनी सदर बाब वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून …

Read More »

एससी/एसटी कोट्यात वाढ करण्यासाठी घटना दुरूस्ती करणार

  सर्व पक्षीय बैठकीतही अनुमती बंगळूर : एका मोठ्या धोरणात्मक हालचालीमध्ये, भाजप सरकारने शुक्रवारी कर्नाटकमध्ये एससी/एसटी कोटा वाढवण्याचा निर्णय घेतला, ज्यासाठी घटनादुरुस्तीची मागणी केली जाईल. न्यायमूर्ती एच. एन. नागमोहनदास आयोगाच्या अहवालावर चर्चा करण्यात आलेल्या काँग्रेस आणि धजद नेत्यांसोबत सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ही घोषणा केली. ही मागणी प्रलंबित …

Read More »

राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3.75 टक्के वाढ

  बंगळूर : राज्य सरकारने राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांना आनंदाची बातमी दिली आहे. गेल्या एक जुलैपासून पूर्वलक्षी प्रभावाने महागाई भत्त्यात 3.75 टक्के वाढ करण्याचे आदेश जारी केले आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आणि सांगितले की, राज्य सरकारी कर्मचार्यांचा महागाई भत्ता 1 जुलैपासून 3.75 टक्के वाढविण्याचा निर्णय …

Read More »

कृतिका जिल्हा स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय टॅलेंट फाउंटन स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. एस. पी. एच. भारतेश कन्नड माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी कृतिका सूरज नायका हिने भाषण स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले असून तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शाळेचे प्रशासक ए. ए. सनदी यांनी कृतिकाला मार्गदर्शन केले होते. शाळा व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्री. …

Read More »