Sunday , July 26 2026
Breaking News

फरारी कुख्यात गुंडावर बेळगाव पोलिसांचा गोळीबार

Spread the love


बेळगाव : बेळगाव येथील फरारी गुंडावर पोलिसांनी गोळीबार करून त्याला जखमी केले आहे. भवानीनगर येथे झालेल्या बिल्डर राजू दोड्डभोम्मनावर याच्या खून प्रकरणी फरारी असलेला गुंड विशाल सिंग चव्हाण याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात त्याच्या पायावर गोळी लागली असून तो जखमी झाला आहे.
मंगळवारी सकाळी धर्मनाथ भवन जवळ ही घटना घडली आहे. त्याच्या माघारी असलेल्या पोलिसांवर हल्ला करून चकवा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.
त्यावेळी एसीपी एन. व्ही. भरमनी यांनी त्याच्या पायावर गोळीबार करून त्याला जेरबंद केलेआहे. भरमनी यांनी त्याच्या पायावर दोन राऊंड फायर केले असल्याची माहिती देखील उपलब्ध झाली आहे.
मंगळवारी सकाळी वीरभद्र नगर धर्मनाथ भवन परिसरात हा थरार घडला. या घटनेत विशाल सिंह हा जखमी झाला असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या दोन महिन्यापूर्वी बिल्डर राजु दोड्डभोम्मनावर याचा खून झाला होता त्या प्रकरणांमध्ये विशाल सिंग हा फरारी होता. विशाल सिंग विजयसिंह चव्हाण (वय 25) हा मूळचा कित्तुर तालुक्यातील चिक्कनंदी गावचा असून सध्या तो शास्त्रीनगर भागात वास्तव्यास होता. बेळगाव पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे सुपारी घेऊन खून करणाऱ्या आरोपींच्या मनात धडकी भरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *