Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

धर्मस्थळ प्रकरणात मोठा ट्विस्ट: तक्रारदार मुखवटा घातलेल्या व्यक्तीला अटक

  बेंगळुरू : धर्मस्थळात मृतदेह पुरण्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. तक्रारदार मुखवटा घातलेल्या व्यक्तीला एसआयटी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. एसआयटी अधिकाऱ्यांनी मुखवटा घातलेल्या व्यक्तीने सांगाड्यांसाठी दर्शविलेल्या १५ ठिकाणी शोध घेतल्यानंतर, मुखवटा घातलेल्या व्यक्तीची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान, त्याने जे सांगितले ते खोटे असल्याचे उघड झाले. त्याने खोटे बोलल्याची …

Read More »

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप

  खानापूर : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्याखाली खानापूर तालुक्‍यातील संगरगाळी येथील रहिवासी विष्णू परशुराम कडोलकर (वय 35) याला बेळगाव येथील विशेष पोक्सो न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्याला 30 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ही घटना 2024 साली घडली होती. आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार करून …

Read More »

मी आयुष्यभर काँग्रेसी म्हणूनच राहीन : उपमुख्यमंत्री शिवकुमार

  विधानसभेत संघाचे गीत गाईल्याबद्दल दिली प्रतिक्रीया बंगळूर : मी एक खरा काँग्रेसी आहे. जन्माने काँग्रेसी आहे. मी आयुष्याच्या शेवटपर्यंत काँग्रेसीच राहीन. माझे जीवन, माझे रक्त, सर्वकाही काँग्रेसी आहे. मी आता पक्षाचे नेतृत्व करत आहे. मी त्याचा आधारस्तंभ म्हणून उभा राहीन,” असे उपमुख्यमंत्री व प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार …

Read More »

चित्रदुर्गाचे काँग्रेस आमदार वीरेंद्र पप्पी यांना ईडीकडून सिक्कीममध्ये अटक

  बेकायदेशीर पैशांच्या हस्तांतरणाचा आरोप; १७ ठिकाणी ईडीचे छापे बंगळूर : चित्रदुर्गाचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र पप्पी यांना करचुकवेगिरी आणि गेमिंग ऍप्सद्वारे बेकायदेशीर मालमत्ता संपादन केल्याच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. सिक्कीमच्या दौऱ्यावर असलेल्या वीरेंद्र पप्पीला कोलकाता येथील ईडी पथकाने ताब्यात घेतले. आता त्यांना बंगळुरला आणले …

Read More »

संजीवीनी फौंडेशनमध्ये श्रावणनिमित्त भजन संकीर्तन कार्यक्रम

  बेळगाव : आदर्शनगर वडगाव येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये श्रावणानिमित्त भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रेणुका भजनी मंडळ,भाग्यनगरच्या भगिनींनी सुरेख आवाजात, टाळ मृदंगाच्या आणि हार्मोनियमच्या साथीने अनेक भजने सादर केली. यानंतर झालेल्या कार्यक्रमात हार्मोनियम वादक शंकर पाटील आणि तबला वादक प्रमोद पाटील यांचा मदन बामणे यांच्याहस्ते शाल भेटवस्तू देऊन सन्मान …

Read More »

गणेशचतुर्थी निमित्त पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची शहरात फेरी

  बेळगाव : गणपती विसर्जन मार्ग आणि इतर भागांतील समस्या जाणून घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी कित्तूर चन्नम्मा सर्कल ते कपिलेश्वर तलावपर्यंत पोलिस आयुक्त भूषण बोरसे, बेळगाव महानगरपालिका आयुक्त शुभा बी. पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जनसंपर्क सदस्य विकास कलघटगी, मनपाचे अधिकारी आणि हेस्कॉमचे अधिकारी यांनी पाहणी केली. शुक्रवारी …

Read More »

गांजा वाहतूक करणारे रॅकेट गजाआड; सीईएन पोलिसांची बेळगावात मोठी कारवाई

  सहा जणांना अटक ; ५० किलो गांजा जप्त बेळगाव : बेळगाव – वेंगुर्ला मार्गावरील सुळगा (हिं.) गावात हॉटेल जवळ एका कारची तपासणी केली असता सुमारे ५० किलो गांजा घेऊन जाणाऱ्या सहा आरोपींना अटक करण्यात आल्याचे बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी आज सांगितले. आज पत्रकार परिषदेत बोलताना ते …

Read More »

सौंदत्ती यल्लम्मा क्षेत्राच्या विकासासाठी २३० कोटीची तरतूद : मंत्री एच. के. पाटील

  बेळगाव : उत्तर कर्नाटकातील शक्तीची देवता असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा क्षेत्राच्या विकासासाठी २३० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, असे पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले. कर्नाटक पर्यटन व्यापार (सुविधा आणि नियमन) कायद्यावर आज विधान परिषदेत बोलताना ते म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लम्मा क्षेत्रात देश-विदेशातून भाविक येतात, …

Read More »

ऑनलाईन पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया उद्बोधन शिबिर रविवारी

  बेळगाव : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्रातील विविध पदवी अभ्यासक्रमासंदर्भातील प्रवेश प्रक्रिया उद्बोधन शिबिर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या रविवार दि. 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे होणार असून शिबिरामध्ये शिवाजी विद्यापीठाचे पदाधिकारी उपस्थित …

Read More »

मनपा सफाई कर्मचाऱ्यांना ब्लॅंकेटचे वितरण; माधुरी जाधव फाउंडेशने जपली सामाजिक बांधिलकी

  बेळगाव : वारा आणि पावसाची पर्वा न करता कष्टाचे आणि शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या मनपा सफाई कर्मचाऱ्यांना समाजसेविका माधुरी जाधव (पाटील) यांनी आपल्या मातोश्री श्रीमती. वासंती रामा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नुकतेच ब्लॅंकेटचे वितरण केले. बेळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार सुरू आहे. परिणामी वातावरणात प्रचंड गारठा निर्माण …

Read More »