Monday , April 20 2026
Breaking News

ऑनलाईन पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया उद्बोधन शिबिर रविवारी

Spread the love

 

बेळगाव : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्रातील विविध पदवी अभ्यासक्रमासंदर्भातील प्रवेश प्रक्रिया उद्बोधन शिबिर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या रविवार दि. 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे होणार असून शिबिरामध्ये शिवाजी विद्यापीठाचे पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

शिबिरामध्ये शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या 2025 -26 सालातील बी.ए., बी.कॉम., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी (गणित), एम.बी.ए. (ऑनलाईन मोड) या अभ्यासक्रमांची माहिती दिली जाणार आहे.
शिक्षण अपूर्ण झालेल्यांकरिता उपरोक्त पदवी व पदव्युत्तर शिक्षण दुरस्थ व ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी या उद्बोधन शिबिराचा बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगळे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *