Monday , December 15 2025
Breaking News

LOCAL NEWS

भरतेश एज्युकेशन अँड ट्रस्टच्यावतीने हिरक महोत्सवीवर्षानिमित्त कार्यक्रम

बेळगाव : भरतेश एज्युकेशन अँड ट्रस्टच्यावतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत भरतेश कॉलेज हिरक महोत्सवात प्रवेश करणार असल्याची माहिती विनोद दोडन्नावर यांनी दिली. भरतेश कॉलेजची स्थापना 1962 मध्ये झाली असून गेल्या 60 वर्षांमध्ये संस्थेने आजपर्यंत 36 हजाराहून अधिक विद्यार्थी घडविले आहेत. यातील काही विद्यार्थी देश …

Read More »

रस्त्यावर भाजी टाकून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

बेळगाव : शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत यासह विविध मागण्यांचा आग्रह करत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले. ११ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत शेतकऱ्यांनी एक अनोखे आंदोलन हाती घेतले असून शेतकरी विश्वासघाताचा सप्ताह या अंतर्गत छेडण्यात आलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. राज्यव्यापी आंदोलनात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी …

Read More »

श्री अम्माभगवान मानवसेवा समिती आणि जिव्हाळा फौंडेशनच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिर

बेळगाव : माणसाने शारीरिक, मानसिक, सामाजिक सक्षमतेबरोबरच अध्यात्मिकरित्या पण आपण सक्षम असले पाहिजे तरच आपण संपूर्णपणे निरोगी असू शकेन. हल्ली अनेकांचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे, असे विचार डॉ. सुरेखा पोटे यांनी व्यक्त केले. निलजी येथील सरकारी प्राथमिक शाळेमध्ये श्री अम्माभगवान मानवसेवा समिती आणि जिव्हाळा …

Read More »

इस्कॉनची हरे कृष्ण रथयात्रा उत्साहात संपन्न

बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने काढण्यात आलेल्या राधा- कृष्ण, गौर- निताय हरेकृष्ण रथयात्रेस रविवारी सकाळी दहा वाजता नाथ पै चौक शहापूर येथून प्रारंभ झाला. इस्कॉनचे परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते आर्च विग्रहांचे पूजन करुन यात्रेस प्रारंभ करण्यात आला. शहापूर विभागातील पोलीस अधिकाऱ्यानिही उपस्थित राहून यात्रेस …

Read More »

हरी बोल गजरात, बेळगावात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या हरेकृष्ण रथयात्रेला प्रारंभ

बेळगाव :  दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे काढली जाणारी राधा कृष्ण, गौर निताय हरेकृष्ण रथयात्रेला आज रविवारी सकाळी मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली आहे. हरीबोल गजरात निघालेल्या रथयात्रेत हजारो कृष्णभक्त सहभागी झाले आहेत त्याचबरोबर श्रीकृष्ण जीवनावर आधारित चित्ररथ रथयात्रेच्या आकर्षण ठरले आहे. बॅरिस्टर नाथ पै चौक शहापूर येथून रथयात्रेला प्रारंभ …

Read More »

कावळा केला कारभारी… घाण आणली दरबारी!

बेळगाव : आमदारकीची निवडणूक जशी जवळ येईल तसं बेळगावचे राजकीय वातावरण तापत चालले आहे. हौसे, नवसे, गवसे सगळे झटून कामाला लागले आहेत. राजकीय पक्षांबरोबरच समितीत सुद्धा वादळ घोंगावू लागले आहे. काही जणांना आमदारकीची स्वप्न पडत आहेत. तर काहींना आमदार झाल्यासारखे वाटते, काही जण घोड्यावर बसले आहेत तर काही जण गुडघ्याला …

Read More »

संतोष आत्महत्या प्रकरण; सात पथके कर्नाटकाच्या विविध भागात

एडीजीपी प्रताप रेड्डी; पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न बंगळूर : अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) (कायदा व सुव्यवस्था) प्रताप रेड्डी शनिवारी उडुपी येथे आले. त्यांनी पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात कंत्राटदार संतोष पाटील यांच्या कथित आत्महत्या प्रकरणी तीन तास बैठक घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. बैठकीत तपास पथकांचा भाग असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता. सकाळी …

Read More »

हरेकृष्ण रथयात्रा उद्या सकाळी 10 वाजता

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे काढली जाणारी राधा कृष्ण, गौर निताय हरेकृष्ण रथयात्रा यंदा रविवार दि.17 एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. रोज होत असलेल्या पावसाचा विचार करून रथयात्रेच्या वेळेत बदल करण्यात आला असून रविवारी सकाळी 10 वाजता नाथ पै चौक शहापूर येथून रथयात्रेस प्रारंभ होईल. तेथून खडेबाजार …

Read More »

संभाजी नगर वडगाव येथे श्री हनुमान जयंती उत्साहात साजरी

बेळगाव : धर्मवीर संभाजी नगर वडगाव येथील श्री गणेश व मारूती मंदिर सांस्कृतिक ट्रस्ट, धर्मवीर संभाजी युवक मंडळ आणि महिला मंडळाच्यावतीने श्री हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 6.30 वा. जन्मोत्सव व पूजाअर्चा करण्यात आली. राजेंद्र कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर सामूहिक हनुमान चालिसा पठन करुन प्रसाद वाटप करण्यात …

Read More »

तरुणाने केला देहदानाचा संकल्प!

देहदानाच्या संकल्पामुळे समाजासमोर निर्माण केला आदर्श! बेळगाव : शारीरिक व्यंग असूनही काहीतरी विशेष करून दाखवणाऱ्या माणसांची उदाहरणे आपल्या आजूबाजूला अनेक आढळतात. कुणी गीत गायनात वेगळेपण दाखवतं तर कुणी वादन कलेत निपुण असतं. कुणी जागतिक जलतरण पटू म्हणून कीर्ती मिळवत तर कुणी पायांनी चित्र काढण्यात पारंगत असतं. अपंगत्वावर मात करत अलौकिक …

Read More »