बेळगाव : बेळगावच्या आरसीयु अर्थात राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय अध्ययन पीठातर्फे कलारकोप्प गावात कोरोना जागृती आणि फूड कीट्सचे वाटप करण्यात आले.
कोविड -१९ महामारीमुळे संकटात सापडलेल्या भूतरामनहट्टी, बेन्नाळी आणि कलारकोप्प गावातील सुमारे ३०० कुटुंबाना फूड किट्स वाटण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर प्रांत कार्यवाह राघवेंद्र कागवाड म्हणाले, लॉकडाउनमुळे अनेक लोक संकटात सापडले आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे अशा लोकांना मदत करण्यासाठी हि अन्नसामग्रीची किट्स वाटप करण्यात येत आहेत. आरसीयूचे कुलगुरू डॉ. रामचंद्रगौडा यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी कुलसचिव प्रा. बसवराज पद्मशाली, मूल्यमापन विभागाचे कुलसचिव प्रा. एस. एम. हुरकडली, वित्त अधिकारी प्रा. डी. एन. पाटील, डॉ. रवींद्र, परमेश्वर हेगडे, सिंडिकेट सदस्य डॉ. आनंद होसूर, डॉ. नीता राव, पंडित दीनदयाळ उपाध्याय अध्ययन पीठाचे संयोजक डॉ. प्रकाश कट्टीमनी, डॉ. शिवलिंगय्या गोठे आदी उपस्थित होते.