बेळगाव : अनगोळ येथील संतमीरा इंग्रजी माध्यम शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त शाळेच्या मैदानावर वनमहोत्सवाचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण ट्रस्टचे सदस्य कृष्णा भट, श्रीकांत कदम, आनंद कॉलिंगण्णावर, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, वीणाश्री तुक्कार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत तुर्केवाडी, अनुराधा पुरी, आशा कुलकर्णी, सुजाता पाटील, गीता वर्पे या मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी कृष्णा भट्टने नुसती झाडे लावून उपयोग होणार नाही त्याची निगा करून त्याला वाढविणे अत्यंत गरजेचे आहे आणि हे काम संतमीराच्या आवारात नक्की होईल असे ते म्हणाले. सध्याच्या ऑक्सिजन कमतरतेमुळे जी स्थिती निर्माण झाली आहे पुन्हा तशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येकानी झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबविणे अत्यंत गरजेचे आहे असे ते म्हणाले.
याप्रसंगी बसवंत पाटील, भारती बाळेकुंद्री, लक्ष्मी पेडणेकर, सुरेखा शहापूरकर, रेणुका काळे, सुनिता पाटील, अश्विनी लोहार, सुजाता होळकर, रेखा मलतवाडी, प्रिया जाधव, रुपा सुपण्णावर व शाळेचा शिक्षक वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षिका अनुराधा पुरी यांनी तर आभार गीता वर्पे यांनी मानले.