संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात गेली पन्नास वर्षे सरली टेलर म्हणून इमानेइतबारे सेवा बजावित आहे. संकेश्वर नागरिक मंचने आपल्या कार्याची दखल घेऊन जागतिक टेलर दिनानिमित्त केलेल्या सन्मानाने आपण भारावून गेल्याचे येथील ज्येष्ठ टेलर बाबालाल मुल्ला यांनी सांगितले. संकेश्वर नागरिक मंचतर्फे टेलर बाबालाल मुल्ला यांचा सत्कार पुष्पराज माने, माजी नगरसेवक किर्तिकुमार संघवी यांचे हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार घालून करण्यात आला. टेलर बाबालाल पुढे म्हणाले, आमच्या व्यवसायाचा जागतिक टेलर दिन म्हणून साजरा होतो. हे ऐकून मनाला अत्यानंद झाला. टेलर (शिवणकाम) ही कला आहे.ती जोपासण्याचे काम आपण करीत आहोत. कर्नाटक राज्य सरकारने आमच्या कार्याची दखल घेऊन ज्येष्ठ टेलर लोकांना पेन्शन सुरू करुन टेलर व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचे कार्य करायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पुष्पराज माने यांनी जागतिक टेलर दिनाचे महत्त्व समजावून सांगितले.यावेळी संकेश्वरातील टेलर रमेश कोपार्डे, रोहित कोपार्डे, मुकुंद कोळेकर, विलास कोळेकर यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. याप्रसंगी विपुल शहा, मल्लीकार्जुन पत्तार, उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta