संकेश्वर (प्रतिनिधी) : महिलांनी स्वतः घ्या आरोग्याची काळजी घेऊन स्वतःच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना चौथ्या कमऱ्याची आवश्यकता असल्याचे बेळगांवच्या प्रख्यात लेखिका माधुरी शानभाग यांनी सांगितले. त्या संकेश्वर श्री शंकरलिंग समुदाय भवन येथे आयोजित स्वयंसिद्धा समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. समारंभाच्या प्रारंभी भारतरत्न लता मंगेशकर यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली. प्रमुख पाहुण्या श्रीमती शीला उमेश कत्तीं, डॉ. राधीका कुलकर्णी, नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, अरुणा कुलकर्णी, डॉ. श्वेता मुरगुडे, मंजुळा हतनुरी, शिल्पा कुरणकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने समारंभाची शानदार सुरुवात करण्यात आली.
प्रारंभी प्रार्थना गीत अर्चना मोकाशी यांनी सादर केले. उपस्थितांचे स्वागत डॉ. श्वेता मुरगुडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय मंजुळा हतनुरी, अरुणा कुलकर्णी यांनी करुन दिला. माधुरी शानभाग पुढे म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतात महिलांनी प्रथम स्वतःला कमी लेखने बंद करायला हवे आहे. आज काळ बदलला आहे. महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. स्वतःच्या कर्तृत्वावर महिलांची गगनभरारी सुरू आहे. ग्रामीण भागातील महिला असो शहरातील महिला स्वतःच्या कर्तृत्वावर आणि घरातील लोकांच्या पाठींब्यावर प्रत्येक क्षेत्रात उत्तम कामगिरी करु शकतात. मोदीजींचा बेटी पडाव, बेटी बचावचा नारा समाजाने आत्मसात करायला हवा आहे. महिलांनी घरची जबाबदारी सांभाळून अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. महिलांनी आपल्या आरोग्याला प्रधानक्रम द्यायला हवे आहे. ज्या महिलेचे आरोग्य उत्तम आहे. तिच चांगले कार्य करु शकते. याकरिता महिलांनी घरची जबाबदारी पार पाडताना आपल्या आरोग्याचीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. महिलांनी आपल्या दिवसाची सुरुवात व्यायम आणि ध्यानधारणेने करायला हवी आहे. महिलांनी ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याच्या पूर्ततेसाठी झटायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. राधीका कुलकर्णी म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करताना महिलांनी रोजचा दिवस महिला दिवस म्हणून साजरा करायला हवा आहे. आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. ही गोष्ट खरोखरच अभिमानास्पद निश्चितच आहे. महिलांनी स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे. तेंव्हाचं महिलांची उन्नती होणार आहे. महिलांनी स्वतःला समजून घेऊन कार्य केल्यास ते निश्चितच सफल होणार आहे. ज्यावेळी महिला एकमेकींना सहाय्य सहकार्य करुन प्रोत्साहन देऊन आपली एकता दाखवून देतील तेव्हाच महिला दिन सार्थक ठरला असे म्हणता येईल. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. केक तयार करणे स्पर्धेचे पहिले बक्षिस सुरेखा देवगोजी, दुसरे बक्षिस माधुरी काकडे, तिसरे बक्षिस जयश्री केस्ती यांना देण्यात आले. मेहंदी स्पर्धेत अर्चना मोकाशी प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. दुसरे बक्षिस सृष्टी बस्तवाडी, तिसरे बक्षिस स्नेहा बस्तवाडी यांना देण्यात आले. केशरचना स्पर्धेचे प्रथम बक्षिस वैष्णवी मुळे हिने पटकाविले. दुसरे बक्षिस विद्या खवरे, तिसरे बक्षिस संगिता वेसनेकर यांना देण्यात आले. समारंभाला शोभना शिपूरकर, मेघा चाळके, सुजाता मंजरगी, अमृता मुळे, सुजाता धुडूंम, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजयालक्ष्मी मिर्जी यांनी केले. आभार डॉ. श्वेता मुरगुडे यांनी मानले.