
संकेश्वर (प्रतिनिधी) : यंदा शेतकऱ्यांना सोयाबीन पिकांने मालामाल केलेले दिसताहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनचा दर प्रति किलो ८० रुपयांपर्यंत पोचला होता. आता दरात थोडीशी घसरण होऊन सोयाबीनला ७४-७५ रुपये दर मिळू लागला आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे तेल दरात मोठी वाढ होऊ लागल्याने सोयाबीन दरात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. पंधरवड्यापूर्वी सोयाबीनचा दर प्रति किलो ६२-६४ रुपये होता. आता तो ७४-७५ रुपये झाला आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सोयाबीन व्यापारी दिपक भिसे म्हणाले, यंदा शेतकऱ्यांना सोयाबीन पिकांने चांगला दर मिळवून दिला आहे. त्यामुळे शेतकरी एकाअर्थी खूष असला तरी त्याच्या दरवाढीच्या अपेक्षा मोठ्या दिसत आहेत. सोयाबीन दराने उचांकी मिळविलेली असली तरी बऱ्याच शेतकऱ्यांनी आणखी दरात वाढ होणार असल्याच्या आशेने सोयाबीन विक्री थांबविलेली दिसत आहे. शेतकऱ्यानी अद्याप सोयाबीनची ५० ते ६० टक्के साठवन ठेवली आहे.शेतकऱ्यांना सोयाबीनला किमान ८० रुपये दर हवा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी रब्बी पीक घेताना सोयाबीनला प्राधान्य दिलेले दिसत आहे.त्यामुळे ज्वारी हरभरापेक्षा सोयाबीनचे उत्पादन बऱ्यापैकी वाढलेले दिसत आहे. सोयाबीन तेज-मंदिच्या झमेल्यात शेतकरी सापडला आहे. सध्या दरवाढ असली तरी आवक जेमतेम असल्याचे त्यांनी सांगितले.

Belgaum Varta Belgaum Varta