
संकेश्वर (प्रतिनिधी) : हुक्केरीचे आमदार, राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांचा ६२ वाढ वाढदिवस कार्यक्रम येत्या सोमवार दि. १४ मार्च २०२२ रोजी विश्वराज भवन हुक्केरी येथे साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त हुक्केरी मतक्षेत्रातील समस्त लोकांना आमंत्रण पत्रिका वाटप केल्या जात आहेत. मंत्रीमहोदयांच्या वाढदिवस कार्यक्रमात नो पक्षपात हे धोरण अवलंबिले जात आहे. त्यामुळे काॅंग्रेस, भाजप, निजद असो अन्य पक्षाचे कार्यकर्ते, सर्व धर्मियांना सिंपल आमंत्रण पत्रिका देऊन आग्रहाचे निमंत्रण दिले जात आहे. हुक्केरी मतक्षेत्रातील समस्त लोकांसाठी विश्वराज भवन येथे स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंत्रीमहोदय उमेश कत्ती यांनी आपल्या वाढदिवस कार्यक्रमाला मतक्षेत्रातील सर्व लोकांना आमंत्रित केलेबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. आमंत्रित पत्रिकेत नो कमळ, नो लिडर फक्त आई-वडीलांचे भावचित्र आणि मंत्री उमेश कत्ती यांचे छायाचित्र आहे. त्यामुळे लोकांना मंत्रीमहोदयांची सिंपल आमंत्रण पत्रिका चांगलीच आवडलेली दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta