Tuesday , March 3 2026
Breaking News

योग करा निरोगी राहा : अमर नलवडे

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : योग-प्राणायम करा, निरोगी राहा, असे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे यांनी सांगितले. ते संकेश्वर साई भवन येथे ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचे उदघाटन करुन बोलत होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्राचे योगशिक्षक बसवराज नागराळे यांनी भूषविले होते. प्रमुख पाहुणे म्हणून साई भवनचे मालक श्रीकांत परीट उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते वृक्षरोपाला जलार्पण करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी उपस्थितीतांचे स्वागत आणि प्रास्ताविक भाषण पी.डी पाटील यांनी केले. अमर नलवडे पुढे म्हणाले, संकेश्वर ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्राचे कार्य लोकांना निरोगी बनविण्याचे चालले आहे. योग केल्यामुळे माणसाला शारिरीक मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. नित्यनेमाने योग-प्रणायम करणाऱ्यांचे आरोग्य उत्तम राहते. त्यामुळे त्यांना दवाखान्याची पायरी चढावी लागत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संकेश्वर बसस्टॅंडचे व्यवस्थापक रविंद्र नाडगौडा म्हणाले, ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्रात दाखल होऊन आपण उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली मिळविल्यचे सांगितले. हुक्केरी तालुका स्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमांत समूह नृत्य, गीत गायन स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे परिक्षक म्हणून लिना कोळी, नृत्य शिक्षक राहुल वारकरी, गौरी अजण्णावर, स्वप्ना सावंत यांनी काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देउन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक एस.आर. चिनमुरी, प्रा.रंजना मगदूम यांनी केले. शेवटी आभार शिक्षिका सुनिता सनदी यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *