
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मंदार हावळ यांनी आपला वाढदिवस निपाणी येथील बसवगोपाल अनाथाश्रममधील मुलांसमवेत साजरा केला. डॉ. मंदार यांना बसवगोपाल अनाथाश्रमचे चालक राजूगौडा गौराई व अनाथ मुलांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदान केल्या. डाॅ.हावळ यांनी अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन स्नेहभोजन दिले. यावेळी डॉ. अशोक, डॉ. पूजा, डॉ. संतोष तसेच प्रमोद कोळेकर, उत्तम पाटील, दयानंद आलुरी, सुनिल पाटील, प्रशांत शिंगे उपस्थित होते.

संकेश्वरात शुभेच्छांचा वर्षाव
डॉ. मंदार हावळ यांना डॉ. सुरेखा हावळ, डॉ. नंदकुमार हावळ यांनी आशीर्वाद दिला. आज दिवसभर अनेक मान्यवरांकडून डॉ. मंदार यांना शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन क्वळी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक रोहण नेसरी, गंगाराम भूसगोळ, प्रमोद होसमनी, कुमार बस्तवाडी, चेतन बशेट्टी, सोनू बेळवी, जयप्रकाश सावंत, माजी उपनगराध्यक्षा सविता सावंत, डॉ. दिपक शेट्टी, डॉ. सुप्रिया हावळ, डॉ. स्मृती हावळ यांचा समावेश आहे.
Belgaum Varta Belgaum Varta