
संकेश्वर (प्रतिनिधी) : राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी हुक्केरी मतक्षेत्रातील सर्वाधिक शेतवाडी रस्ता निर्माणचे काम केल्यामुळे शेतकरी सुखावल्याचे हिरण्यकेशी साखर कारखाना अध्यक्ष निखिल कत्ती यांनी सांगितले. ते गवनाळ-कमतनूर शेतवाडीच्या रस्ता कामांचा शुभारंभ करुन बोलत होते. ते पुढे म्हणाले, गवनाळ-कमतनूर शेतवाडीच्या रस्ता निर्माण कामामुळे येथील शेतकऱ्यांची सोय झाली आहे. यावेळी हिरण्यकेशी साखर कारखाना संचालक अप्पासाहेब शिरकोळी, बसवराज बस्तवाडी, रोहित चिटणीस, प्रशांत पाटील, कुमार बस्तवाडी, चंदू किल्लेदार, सोनू बेळवी, बाबूराव मरीगुद्दी शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta