

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरचे धडाडी नगरसेवक लढवय्या नेते संजय दुंडापण्णा नष्टी यांच्या अकालीक निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन संकेश्वर वॉकर्स वे सदस्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी बोलताना वॉकर्स वे फ्रेंडसचे किरण किंवडा म्हणाले संजय नष्टी हे संकेश्वरच्या सर्व २३ प्रभागाच्या विकासासाठी झटणारे धडाडीचे नगरसेवक होते. त्यांना सर्व प्रभागांची काळजी असायची संकेश्वर भागातील ग्रामीण भागत देखील त्यांचे खंदे समर्थक आहेत. त्याअर्थी ते एक निष्णांत राजकारणी होते. त्यांच्या अकालीक निधनाने संकेश्वरची मोठी हानी झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सेवानिवृत्त प्राध्यापक जी. एस. वाली, बसवराज बस्तवाडी, शिवा बोरगांवी, विनोद संसुध्दी, गजानन दुंडगे, आणप्पा केस्ती वॉकर्स वे चे सदस्य उपस्थित होते. वॉकर्स वे फ्रेडसनी संजय नष्टी यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली.
Belgaum Varta Belgaum Varta