Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वर “एआयएमआर” विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी..

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील व्यवस्थापन महोत्सवात संकेश्वर
अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च, विद्यार्थ्यांनी विविध पारितोषिके जिंकून घवघवीत यश संपादन केले. मिस. किरण पाटील हिने प्रकल्प प्रस्ताव लेखनात प्रथम पारितोषिक पटकाविले. मिस. भाग्यश्री कापसे यांच्या नेतृत्वाखाली पूजा माळी, शिवानी राठोड आणि कावेरी सुतार यांनी बिझनेस प्लॅन स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे रोख 7000 रु.चे पारितोषिक पटकावले. त्यांची योजना पुण्यातील एका प्रवर्तकाने घेतली आहे. संदेश मेत्री, राहुल रवळोजी आणि अब्दुल बासित यांच्यासह श्री. सोपान कांबळे यांच्या नेतृत्वाखालील आणखी एका संघाने तृतीय पारितोषिक पटकावले‌ विजेत्या विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन. श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक संघाचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील, स्थानिक नियंत्रण समितीचे चेअरमन, युवा नेते श्री. विनयगौडा पाटील, व्यवस्थापकीय संचालिका डॉ. विद्या स्वामी यांनी केले आहे.
प्रा. संतोष तेरणीमठ, प्राध्यापक डॉ. प्रकाश, प्रा. सुनील, प्रा.आनंद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सांगली येथील राष्ट्रस्तरीय व्यवस्थापन महोत्सवात संकेश्वर एआयएमआर विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *