संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री कालिकादेवी देवस्थान जिर्णोध्दार ट्रस्ट कमिटीतर्फे श्री कालिकादेवी यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. आज चैत्र पंचमीला सकाळी देवीला महाभिषेक करण्यात आला. महामंगल आरती झाले नंतर गावातील प्रमुख मार्गे श्री कालिकादेवीचा पालखी उत्सव काढण्यात आला. यामध्ये रामबाग, अँथनी येथील मोहनेश आचार्य समुहाने परंपरागत पद्धतीने काळम्मा इरण्णा देवाचा अवतार आपल्या कार्यक्रमातून सादर केला. पालखी उत्सवांच्या महाप्रसाद वाटप करण्यात आले. याचा लाभ हजारो भक्तगणांनी घेतला. शुक्रवार दि. १ एप्रिल २०२२ रोजी देवीला महाअभिषेक करुन दिपोत्सव आणि ओटी भरणे घ्या कार्यक्रमाने यात्रोत्सवाची सुरवात करण्यात आली. शनिवार दि. २ रोजी विश्वकर्मा ध्वजारोहण आणि देवीला अभिषेक आदी कार्यक्रम पार पडले. यावेळी बोलताना श्री कालिकादेवी देवस्थान जिर्णोध्दार ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष राजकुमार बी. पोतदार म्हणाले, यावर्षी श्री कालिकादेवीच्या कृपेने यात्रोत्सव होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे देवीचा उत्सव साधेपणाने साजरा करावा लागला होता. यंदा मात्र देवीचा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जात असल्याचे सांगितले. यावेळी माजी नगरसेवक शिवानंद नेसरी, बसवराज बागलकोटी, आनंद शिरकोळी, नगरसेवक रोहण नेसरी, विजय संसुध्दी, सचिन सपाटे, कालिकादेवी देवस्थान जिर्णोध्दार ट्रस्ट कमिटीचे सुरेश बोरगांवकर, सुभाष पोतदार, साईनाथ पाश्चापूरे, गोपाळ बोरगांवकर, नारायण पोतदार, भास्कर बोरगांवकर, नारायण सोनार, मौनेश पोतदार, कुणाल पोतदार, सेवानिवृत्त प्रा. बडिगेर, श्रीमती जयश्री पोतदार, गिळता बोरगांवकर, कमला पोतदार, लता बोरगांवकर, जयश्री पोतदार, शोभा साळी, सुजाता पोतदार, वणिता अंम्मणगी, प्रेमा पोतदार, वनजाक्षी पोतदार, पद्मजा सोनार, समाज बांधव भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिरात श्री कालिकादेवी दर्शनासाठी भक्तगणांंनी मोठी गर्दी केली होती.
Check Also
हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध
Spread the love हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी …